Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

आनंदाची बातमी! – गृह आणि कार लोन झालं स्वस्त ; व्याजदरात मोठी कपात.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच रेपो दरात पूर्ण 50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा कर्ज घेतलेल्यांना मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे एफडी गुंतवणूकदारांचे नुकसान होणार आहे. रेपो दरात कपात केल्यानंतर आता बँका एकापाठोपाठ एक आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात करत आहेत. आता देशातील तीन प्रमुख सरकारी बँकांनीही आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. यात युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे. यापूर्वी खासगी बँक एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात कपात केली आहे. देशातील सरकारी बँक बीओबीनेही नुकतीच आपल्या आरएलएलआरमध्ये 0.50 टक्के कपात केली आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया –

युनियन बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. बँकेने आपल्या ईबीएलआर आणि आरएलएलआरमध्ये 0.50 टक्के कपात केली आहे.

इंडियन ओव्हरसीज बँक –

इंडियन ओव्हरसीज बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर कर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. आता बँकेचा आरएलएलआर 8.85 टक्क्यांवरून 8.35 टक्क्यांवर आला आहे.

कॅनरा बँक –

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेनेही व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. आता कॅनरा बँकेने आपला आरएलएलआर 8.75 टक्क्यांवरून 8.25 टक्क्यांवर आणला आहे.

SBI कडून 7 लाख रुपयांच्या कार लोनवर मासिक EMI किती?

तुम्ही SBI कडून 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7 लाखांचे कार लोन घेत असाल आणि तुम्हाला हे लोन 7.10 टक्के व्याजदराने मिळत असेल तर तुम्हाला दरमहा 14,565 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही 5 वर्षात एकूण 8,73,891 रुपये बँकेला भराल. अशा वेळी तुम्ही एकूण 1,73,891 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्याल.

कार लोन घेण्यापूर्वी तुमचा पगार तपासा –

अनेक जण कर्ज घेऊन कार खरेदी करतात पण नंतर ते गाडीचा EMI भरू शकत नाहीत. कारण त्यांच्या महिन्याच्या पगारातील अर्धा किंवा त्याहून अधिक हिस्सा EMI भरण्यात जातो. अशा वेळी बाकीचा खर्च करणे खूप अवघड होऊन बसते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी कार लोन घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा पगार लक्षात ठेवला पाहिजे. कार लोन घेण्यापूर्वी तुमचा मासिक पगार किती असावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती असणे आवश्यक आहे. कार लोन घेण्यापूर्वी जर तुम्ही हा फॉर्म्युला लावला तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जाणून घेऊया काय आहे 20/4/10 फॉर्म्युला.

‘हे’ सूत्र समजून घ्या –

कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 या नियमाची माहिती असायला हवी. येथे 20 म्हणजे 20 टक्के डाऊन पेमेंट, म्हणजेच कार खरेदी करताना तुम्हाला कारच्या एकूण किमतीच्या 20 टक्के इतके डाउन पेमेंट करावे लागेल. 4 म्हणजे 4 वर्षांचा कालावधी, तुम्ही 4 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचे कर्ज घेऊ नये. तर 10 म्हणजे पगाराच्या 10 टक्के. तुमचा मासिक EMI तुमच्या पगाराच्या फक्त 10 टक्क्यांपर्यंत असावा.

(विशेष सूचना : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles