Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या कला दालनाचे भारती महाराज यांच्या हस्ते उदघाटन! ; दर्जेदार धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर.

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्था “गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या” कला दालनाचे नुकतेच उदघाटन रोजी तळवणे येथील भारती महाराज मठाचे मठाधीश श्री राजेंद्र स्वामी भारती महाराज यांच्या हस्ते न्हावेली येथे मोठ्या थाटात पार पडले. या मंगल प्रसंगी दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सकाळी सत्यनारायण महापूजा आणि शुद्धी करण होम झाल्यानंतर दुपारी ३.३० वाजता भारती महाराज मठाचे मठाधीश श्री राजेंद्र स्वामी भारती महाराज यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उवस्थितीत या कलादालनाचे उदघाटन पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे कुडाळचे तहसीलदार श्री. वीरसिंग वसावे, संस्थेचे अध्यक्ष संगीत अलंकार श्री. दिप्तेश मेस्त्री, उपाध्यक्ष श्री सचिन गावडे, सचिव श्री. गीतेश परब, सहसचिव श्री. रोहित निर्गुण, खजिनदार सौ. दर्शिता मेस्त्री, अजित पोळजी, आनंद माळकर, संतोष गोडकर, तबला वादक भावेश राणे, शिक्षक प्रसाद आडेलकर, सुधीर राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कला दालनाच्या माध्यमातून सर्व संगीत प्रकार एकाच छताखाली आणायचा मानस श्री. दिप्तेश मेस्त्री यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच भविष्यात संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम याठिकाणी राबविण्यात येतील, असेही मेस्त्री यांनी सांगितले. गायन, तबलावादन, पखवाजवादन, बासुरी, गिटार, की बोर्ड, कथ्थक आदी संगीत प्रकार या संस्थेच्यावतीने सुरू होत आहेत. सायंकाळी उशिरा कथ्थक शिक्षिका सौ. प्रज्ञा मालवणकर आणि सहकारी यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण, भावेश राणे आणि शिष्य यांचे तबला वादन, यामेश खवणेकर यांचे बासरी वादन, बाव, कुडाळ येथील कीर्तनकार श्री. गोविंद आसोलकर यांचे कीर्तन आणि श्री हनुमंत सावंत, माजगाव यांचा गीत हनुमंत हा बहारदार कार्यक्रम झाला.
याच दिवशी श्री. दिप्तेश मेस्त्री यांचा जन्मदिवस असल्यामुळे सर्व शिष्यगण आणि मित्र मंडळींच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles