विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु ! ; पात्र खेळाडूंनी २३ जूनपर्यंत नाव नोंदणी करावी.

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत ०९ क्रीडा प्रबोधनीमध्ये सरळप्रवेश ५० टक्के व कौशल्य चाचणी ५० टक्के प्रक्रियेअंतर्गत खालील निकषांनुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी पात्र खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे २३ जून २०२५ पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कार्यासन क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रीयासाठी नियम अटी व शर्ती पुढीलप्रमाणे
क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे -राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. ही ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

क्रीडा प्रबोधिनी मधिल क्रीडा प्रकार –
ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफिटंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सींग अशा १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.
प्रवेश प्रक्रीया सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी- सरळ प्रवेश प्रक्रिया- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
खेळनिहाय कौशल्य चाचणी- क्रीडा प्रबोधिनीत असलेल्या खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
वैद्यकीय चाचणी- चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिक दृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते.खेळनिहाय विभागस्तरावर क्रीडा कौशल्य चाचणीचे आयोजन दि.२६ ते २७ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
सरळ प्रवेश – खेळ- हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो जिम्नॅस्टिक्स
विभागीय चाचणी दिनांक – २६ ते २७ जून २०२५
कौशल्य चाचणी- हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स,
विभागीय चाचणी दिनांक २६ ते २७ जून २०२५
सन २०२५-२६ प्रवेश प्रक्रिया क्रीडा कौशल्य व सरळ प्रवेश चाचणी वयोमर्यादा
सरळ प्रवेश- खेळ – हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो जिम्नॅस्टिक्स
वयोमर्यादा – ०७.०७.२००६ नंतर जन्मलेले व ०८.०७.२०२५ रोजी पर्यंत १९ वर्ष पूर्ण झालेले खेळाडू
कौशल्य चाचणी-
खेळ – हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स,
वयोमर्यादा -०७.०७.२००६ नंतर जन्मलेले व ०८.०७.२०२५ रोजी पर्यंत १९ वर्ष पूर्ण झालेले खेळाडू

सर्वसाधारण सूचना –
चाचण्याकरिता येणाऱ्या खेळाडूनी स्वतः निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे. चाचण्याकरिता येणाऱ्या खेळाडूंनी संबंधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इ. माहिती चाचणीस्थळी आणणे बंधनकारक आहे. मान्यत्तेत निवड प्रक्रिया राबविताना सरळ प्रवेश प्रक्रियेन्चये जर इच्छुकांची संख्या ५० टक्के पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणी प्रथम त्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल व उर्वरित जागेवर कौशल्य चाचणीव्दारे प्रवेश देण्यात येईल. विभागस्तरीय चाचण्यामध्ये पात्र ठरण्याऱ्या खेळाडुंना राज्यस्तरीय चाचणीबाबतच्या सुचना वेळोवेळी देण्यात येतील.
जिल्हयातील जास्तीत जास्त राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडा प्रबोधनीकरिता होणाऱ्या प्रवेश चाचणीत सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे 23 जून 2025 रोजीपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
०००००

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles