वेंगुर्ला : महाराष्ट राज्यातून दहावी बारावी परीक्षांमध्ये कोकण बोर्ड अव्वल येते. परंतु पुढे शासकीय अधिकारी म्हणून कोकणातील मुले पुढे येत नाहीत कारण शासकीय स्पर्धा परीक्षांचे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कोकणातील मुलांची ही अडचण जाणून सिंधुदुर्गातील मुलांना शासकीय अधिकारी बनण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मुंबईस्थित “मालवणचो कट्टो प्रतिष्ठानने” कोकणचेच सुपुत्र असलेले कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई सीमाशुल्क सत्यवान यशवंत रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित केले आहे.
दरवर्षी दहावी/बारावी निकालात कोकण बोर्ड राज्यात अव्वल येतं. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हीच हुशार मुले इंजिनीयर, डॉक्टर होण्याची स्वप्ने घेऊन दिशा भरकटतात आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर असणारी मुले कुठेतरी मागे पडतात. परंतु हीच हुशार मुले शासकीय स्पर्धा परीक्षांपासून अनभिज्ञ राहतात, कारण त्यांना शासकीय स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमधून शासकीय अधिकारी क्वचितच तयार होतात. जिल्ह्यातील अशा हुशार मुलांना शासकीय स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सत्यवान रेडकर निःशुल्क मार्गदर्शन करतात. त्यांच्या या समाजोपयोगी कार्यात “सहकारातून सदाचार” हे ब्रीद घेऊन सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करणारी मुंबईस्थित संस्था “मालवणचो कट्टो प्रतिष्ठान” हिरहिरीने उतरली असून संस्थेने वेंगुर्ला येथील बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयातील मुलांसाठी निःशुल्क UPSC व MPSC शासकीय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.
बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयातील मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मालवणचो कट्टो प्रतिष्ठानने केले आहे.
बॅ. खर्डेकर महाविद्यालयात १९ जुलै रोजी सत्यवान रेडकर यांचे निःशुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यान ! ; ‘मालवणचो कट्टो प्रतिष्ठान मुंबई’चे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


