नवी दिल्ली : लोकसभेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे एकूण 17 खासदारांना संसदरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) सुप्रिया सुळे, भाजपाचे नेते रवी किशन, निशिकांत दुबे, शिवसेना (ठाकरे गट) अरविंद सावंत यांच्यासह इतरही खासदारांचा समावेश आहे.
कोणाकोणाला मिळाला पुरस्कार –
लोकसभेतील विशेष योगदानाची दखल घेत, हा पुरस्कार दिला जातो. 16 व्या लोकसभेनंतर सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल हा विशेष पुरस्कार एकूण 17 खासदारांना देण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे (महाराष्ट्र), शिवसेना नेते श्रीरंग अप्पा बारणे (महाराष्ट्र), भाजपाच्या स्मिता उदय वाघ, शिवसेनेचे नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपाच्या मेधा कुलकर्णी या खासदारांचा समावेश आहे. भाजप नेते भर्तृहरी महताब (ओडिशा), क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे नेते एनके प्रेमचंद्रन (केरळ), भाजपाचे प्रवीण पटेल, विद्युत बरन महातो, दिलीप सैकिया यांनाही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


