माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सावंतवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सत्कार! ; शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ यांचे आवाहन.

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यांमध्ये उद्या (रविवार) दिनांक २७/०७/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता सावंतवाडी येथे काजी शहाबुद्दीन हॉल (बस स्थानकासमोर) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल मान्यवरांचा सत्कार आयोजित केला आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील माजी जि.प. सदस्य, माजी पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, शहर प्रमुख, शहर संघटक, उपशहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपतालुका संघटक, विभाग प्रमुख, विभागीय संघटक, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख महिला आघाडी व युवा सेना सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश गुरुनाथ राऊळ यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles