भुवनेश्वर (ओडिशा) : येथील ताज विवांता येथे आज दि. २८ जुलै २०२५ रोजी ‘पाञ्चजन्य’ यांच्या वतीने आयोजित सुशासन संवाद ‘ओडिशा की उड़ान’ या कार्यक्रमास महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे उपस्थित राहिले. यावेळी तेवर, तर्क आणि तरक्की या चर्चासत्रादरम्यान राष्ट्रहित, संस्कृती आणि एकात्मतेवर विचार व्यक्त करून हिंदू विचारधारेविषयी ठाम भूमिका मांडली.

यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री मा. श्री.मोहन चरण माझी, ओडिशाच्या उपमुख्यमंत्री श्रीमती.प्रभातीजी परिडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री. मुकुलजी कानिटकर, राष्ट्रीय संयोजक, प्रज्ञा प्रवाह तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री.जे.नंदकुमारजी,उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक डॉ. विक्रमजी सिंह उपस्थित होते.


