सावंतवाडी : विद्यार्थी दशेत मिळालेले संस्कार हे पुढील आयुष्यासाठी शिदोरी असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कला-गुणांना वाव दिला तर नक्कीच सर्वांगीण प्रगती साधता येते व कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी केले. सावंतवाडी शहरातील कळसुलकर हायस्कूलच्या विविध कला गुणांच्या गुणदर्शन सोहळ्यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नगरसेवक आनंद नेवगी, युवा नगरसेवक देवा टेमकर, नगरसेविका दुलारी रांगणेकर, संस्थेचे अध्यक्ष व यशस्वी उद्योजक शैलेश पै, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. सावंत, माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान प्रशालेच्या वतीने संस्थाध्यक्ष शैलेश पै यांनी नूतन नगरसेवक सुधीर आ आडिवरेकर यांचा स्नेहसत्कार केला. दरम्यान शाळेच्या वतीने नवनिर्वाचित उपस्थित असलेल्या नगरसेवकांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.



