Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटातील असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकावीत.! ; वेंगुर्ले येथे हिंदू धर्माभिमानी मंडळींकडून तहसीलदारांना निवेदन, शासनाचे वेधले लक्ष.

वेंगुर्ले : ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ पाहिल्यावर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवली असल्याचे स्पष्ट होते. ट्रेलरमधेच जर इतक्या स्वरूपात भ्रामक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, तर संपूर्ण चित्रपटात आणखीन मोठ्या प्रमाणावर चुकीच्या, विकृत आणि असत्य गोष्टी असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे समाजात विशषेतः विद्यार्थी आणि तरुणपिढी यांमध्ये भ्रामक माहिती पसरवली जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील सर्व असत्य आणि भ्रामक दृश्ये काढून टाकण्यात यावीत, तसे न झाल्यास चित्रपट प्रदर्शीत होऊ देऊ नये, अशी आक्रमक भुमिका वेंगुर्ले येथे आज हिंदू धर्माभिमानी मंडळींनी घेतली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय अशा जोरदार घोषणा करून यासंबंधी तहसीलदार यांना निवेदन देत शासनाचे लक्ष वेधले.
वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयासमोर हिंदू धर्माभिमान्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याबाबत बोलताना बाबुराव खवणेकर यांनी अशा चित्रपटामधून कसा चुकीचा संदेश समाजात पसरविला जातो आणि असे प्रकार काल आज नाही तर अनेक वर्षा पासून सुरू आहेत. पण हिंदु धर्माभिमानी त्यांचा उद्देश कधीही सफल होऊ देणार नाहीत असे सांगितले. तर प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी असे प्रकार आम्ही हिंदु म्हणून कधीही सहन करणार नाही. तहसीदार ओंकार ओतारी यांनी निवेदन स्वीकारल्या नंतर आमच्या भावना आपण शासनापर्यंत पोहचवा असे आवाहन सर्वांच्या वतीने श्री. देसाई यांनी केले. यावेळी तहसीलदार श्री. ओतारी यांनीही आपल्या भावना शासन दरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिले.


यावेळी श्री बाबुराव देऊ खवणेकर, श्री प्रसन्ना लक्ष्मण देसाई, श्री डॉ. दर्शेष दिपक पेठे, श्री विष्णू चंद्रकांत परब, श्री श्याम भा. खोबरेकर, श्री भाऊ केरकर, श्री सुरेंद्र चव्हाण, श्री अभिषेक राजीव वेंगुर्लेकर, श्री प्रज्वल संदीप कोयंडे, श्री सुहास सदानंद गवंडळकर, श्री अनिल दिगंबर सुतार, श्री संजय विठ्ठल तेरेखोलकर, श्री आपा रामचंद्र धोंड, श्री रफीक गुड्डू शेख, श्री आनंद रघुनाथ बोवलेकर, श्री रघुनाथ लक्ष्मण खानोलकर, श्री कृष्णा चंद्रकांत कुडव, श्री दिगंबर नामदेव आरोसकर, सौ. वृंदा कमलाकांत मोर्डेकर, सौ मानसी म. परब, सौ प्रियांका संदीप कोयंडे, श्री निलेश र . गवस, सौ श्रद्धा महेश जुवलेकर, श्री नरहरी भगवान खानोलकर, श्री महेश राघोबा जुवलेकर, श्री अरुण दत्तात्रय राणे, श्री चंद्रशेखर रामकृष्ण तोरसकर, श्री नित्यानंद आठलेकर, सौ श्रेया शैलेश मयेकर, श्री रामचंद्र कमलाकांत मोर्डेकर, श्री नामदेव यशवंत सरमळकर, श्री मंदार भालचंद्र बागलकर आणि अन्य हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles