सावंतवाडी : प. पू. पद्मनाभ शिष्य संप्रदाय तथा स्वामी सदानंद आरोग्य धाम आयोजित श्रीमत सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव प्रित्यर्थ मोफत “चिकित्सा शिबिर” श्री क्षेत्र परंधाम मठ, गुळदुवे येथे मंगळवार दिनांक १२ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० :०० ते दुपारी ३:०० यावेळेत आयोजित केले आहे.
या आरोग्य चिकित्सा शिबिरात, जीर्ण त्वचा रोग, Psoriasis, Eczema जीर्ण सांध्यांचे आजार, आमवात, मधुमेह,लठ्ठपणा, हृदयरोग, मानसिक आजार ,स्वमग्नता(Autism) केसांच्या समस्या, जीर्ण सर्दी,Frozen Shoulder Cervical Spondylitis , वंध्यत्व व मासिक पाळीचे आजार,PCOD ,Painful menses ,डोळ्यांचे आजार,मुतखडा, पित्ताचे आजार, मूळव्याध, Prostate enlargement Chronic Constipation यां व्याधींवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार असून ,प्राथमिक औषधे सुद्धा मोफत दिली जाणार आहेत.
अधिक माहिती व आगाऊ नाव नोंदणी करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक – शंकर सावळ: ८३२९१८८४१४ ,भाविका काळोजी- ८८९८६१५७२९ ,आबा केदार- ९४२०६५३२७१ , दिनानाथ काळोजी- ९११२८४४४५४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


