कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाच्या वतीने गुरुवार दि ७ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेंड सेंटर येथे ‘फळे व अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी व उपयुक्त रसायाने’ या विषयावर एकदिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून सुश्री स्नेहा जाधव उपस्थित होत्या.या कार्यशाळेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योजकांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी फळे व अन्न प्रक्रियेमधील अभियांत्रिकेची मूलतत्वे, अभियांत्रिकेतील उपकरणे व तंत्रज्ञान,उपयुक्त अन्न रसायाने – ओळख व सुरक्षित वापर,गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया व प्रयोगशाळा चाचण्या आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या समारोपासाठी जिल्हा उद्योग केंद्र ओरोसचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले आणी जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्गचे व्यवस्थापक पत्की प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.यावेळी त्यांनी उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फळ प्रक्रिया संघाचे अध्यक्ष श्रीधर ओगले,सचिव दीनानाथ गावडे व खजिनदार हर्षल हिंदळेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


