गौरवशाली तिरंगा आपल्या शौर्याचं प्रतीक.!, तिरंगा रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद! ; युवा नेते संदीप गावडे यांचं उत्तम संयोजन.! ; राष्ट्रभक्तीच्या जयघोषणांनी दुमदुमली सुंदरवाडी !

  • सावंतवाडी येथे भव्य दिव्य तसेच असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा संपन्न.

सावंतवाडी : जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेमध्ये आज सावंतवाडी करांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. सर्व समावेशक तसेच राष्ट्र प्रेमाचे प्रतीक म्हणून या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. या यात्रेमध्ये सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थी , एनसीसी कॅडेट्स, महिला, डॉक्टर, पत्रकार,व्यापारी, तसेच तालुक्यातिल असंख्य नागरिक यांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली. सावंतवाडीकरांच्या मनात असलेल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती यावेळी दिसून आली. जिल्ह्यातील आकर्षक व भव्य अशी तिरंगा यात्रा निघाली अशी उपस्थितांची प्रतिक्रिया यावेळी होती.

या तिरंगा यात्रेला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, हर घर तिरंगा जिल्हा संयोजक संदीप गावडे, मनोज नाईक, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, यांसह महिला पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles