सावंतवाडी : तालुक्यातील मळगावातील छञपती शिवाजी महाराज चौक येथे ५० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभाचे भव्य उद्घाटन सोहळा शनिवारी, दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन हिंदुत्वाचे ध्येयधगते अनिकुंड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, तसेच धारकरी व हिंदू प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.
हा ध्वजस्तंभ हिंदवी स्वराज्याच्या गौरवाची आणि शिवकालीन प्रेरणेची जाणीव भावी पिढ्यांना करून देणारा ठरणार आहे.


