सावंतवाडी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मळगाव ग्रामस्थ व भिलवाडी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी सायं. ३ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून, विजेत्या पथकाला ११,१११ रुपये रोख पारितोषिक व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
उत्सवाचे मुख्य घोषवाक्य “बोल बजरंग बली की जय” व “गोविंदा रे गोपाळा” असे ठेवण्यात आले असून, पारंपरिक संगीत, ढोल-ताशांच्या गजरात कार्यक्रम रंगणार आहे.
गावातील ग्रामस्थांनी तसेचं सर्व नागरिकांना उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष श्री.पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.


