Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आम्ही राजकारण करायला नाही, न्याय मागायला आलोत : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले. ; जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट येथील घटनेची पाहणी.

मालवण :  छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनतेचे राज्य निर्माण केले. मात्र आज आपले सार्‍यांचे दैवत असणार्‍या छत्रपतींचा पुतळा अवघ्या साडेआठ महिन्यात कसा काय कोसळतो?, छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्मांतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संकल्पना अस्तित्वात आणली. शिवराय खऱ्या अर्थाने जनतेचे राजे होते. मात्र आज महाराष्ट्रात जे चाललं आहे ते बघवत नाही. आम्ही इथे महाराजांना नमन करायला आलो आहोत. कोणत्याही राजकीय हेतूने या किल्ल्यावर आलो नाहीत, फक्त न्याय मागायला आलो आहोत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आज राजकोट येथील घटनेची पाहणी करण्यात आली.  यावेळी ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले यांसोबत उबाठा शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, मालवणचे तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर तसेच काँग्रेसचे साईनाथ चव्हाण, डॉ. साठे, मेघनाथ धुरी, अरविंद मोंडकर, श्रीकृष्ण तळवडेकर, अगोस्तीन डिसोजा, बाबू डायस, अँथोनी फर्नांडिस, ममता तळेगावकर, संदेश कोयंडे, लक्ष्मीकांत परुळेकर, सरदार ताझर, संदेश फाटक, रितेश प्रभूआजगावकर, मनोज वाघमोरे, सुनील गावडे, सचिन मुळीक, सखाराम राऊळ यांसह महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे हे साऱ्यांसाठी दुर्दैवी घटना आहे. मात्र इथे येऊन काही लोकं राजकारण करतात, असे करू नये. खऱ्या अर्थाने छत्रपतींचा पुतळा कोसळणे म्हणजे एक प्रकारे आपल्या अस्मिता ढासळणे आहे. आपण सारे छत्रपतींचे मावळे आहोत. साऱ्यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा महाराजांचा पुतळा कसा उभा राहील?, याबाबत पक्षीय मतभेद बाजूला करून महाराजांसाठी तरी एकत्र येणे गरजेचे आहे. मात्र येथे तसे काही झाले नाही याचे अतिव दुःख वाटते. महाराजांच्या नावावर काही लोकं उगीच राजकारण करतात, हे खेदजनक असल्याचेही माजी मंत्री प्रवीण भोसले म्हणाले.

दरम्यान,उबाठा शिवसेनेचे विधानसभा सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ म्हणाले, खऱ्या अर्थाने महाराजांचा पु ळा कोसळणे ही घटना मन सुन्न करणारी आहे. या घटनेस जबाबदार असणारे व भ्रष्टाचार करणारे फरार आहेत. अतिशय कमी अनुभव असलेल्या नवतरुणाला एवढे मोठे काम कसे काय दिले जाते?, या सर्व भ्रष्टाचारामागे कोण झारीचा शुक्राचार्य आहे?, त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे. महाराजांच्या या अवमानाला कोणीही सहन करू शकत नाही.

 

यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त करून महाराजांबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles