Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मनोजदादाच्या लढ्याला अर्चनाताईंच्या ‘रक्षा’ची समर्थ साथ.! ; जरांगे- पाटील यांसोबत अर्चना घारे-परब यांचे रक्षाबंधन.

सावंतवाडी : मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे, यासाठी जिवाची तमा न बाळगता समाजाला आपले कुटुंब मानून लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मालवण राजकोट येथील दुर्देवी घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहाणी करण्यासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी त्यांची भेट घेत रक्षाबंधन केले.

मनोजदादा जरांगे मराठा समाजासाठी लढत आहेत. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झगडत आहेत. समाजासाठी झुंज देणाऱ्या भावाचे हात बळकट करण्यासाठी दादांना रक्षाबंधन केले. लाडक्या भावाला राखी बांधून मनोज दादांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या लढ्याला यश येवो अशी प्रार्थना महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या चरणी अर्चना घारे-परब यांनी केली‌.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles