Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

वेंगुर्लेत २७ रोजी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन! ; ग्रामदैवत रामेश्वर मंदीर येथून सायंकाळी ४ वाजता होणार शुभारंभ!

वेंगुर्ला : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेंगुर्ला व हिंदुधर्माभिमानी मंडळी वेंगुर्ला तर्फे भारतमातेच्या कल्याणासाठी, देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे. ही दौड वेंगुर्ल्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. या दौडीचे मार्गक्रमण श्री रामेश्वर मंदिर – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक माणिकचौक-शिरोडा नाका-शिवदुर्गा मित्रमंडळ दुर्गामाता (सुंदर भाटले)-मातोश्री कला क्रिडा मंडळ दुर्गामाता- बाजारपेठ-गाडीअड्डा मित्रमंडळ दुर्गामाता -मारुती स्टाॅप-रामेश्वर मंदिर असे होणार आहे.तसेच दौडीची सांगता झाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील सर्व माताभगिनींना संबोधीत करतील.


छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्माआधी हिंदुस्थान मध्ये इस्लामी सत्ता राज्य करत होत्या हिंदूंची अनेक प्राचीन मंदिरे उध्वस्त होत होती. दिवसाढवळ्या आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. गाईंची हत्या होत होती संपूर्ण हिंदुस्तान हा भगव्याचा हिरवा गार झाला होता. असा सर्व देश, धर्म संकटात असताना जिजामातेंनी आपल्या पोटात गर्भ वाढत असताना नवरात्रीतले नऊ दिवस अखंड व्रत करून देवीकडे स्वतःच्या सुखासाठी, कुटुंबासाठी नाही तर देव, देश, धर्माच रक्षण करणारा आणि हिंदूंचं हिंदवी स्वराज्य निर्माण करून धर्माचे रक्षण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल असं दुर्गा मातेकडे भवानी मातेकडे मागणं मागितलं आणि ते मागणं देवीने ऐकलं आणि साक्षात जिजामातेच्या पोटी भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे दृष्टांचा नाश करण्यासाठी श्रीशिवाजी महाराजांच्या रूपात जन्माला आले आणि त्यांनी हिंदूंचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. आजही आपल्या देशावरती, धर्मावरती अनेक संकटे उभे आहेत त्या संकटांना मात करण्याची त्या संकटांचा समूळ निर्दालन करण्याची शक्ती आम्हाला मिळावी तसेच श्री शिवछत्रपती यांच्यासारखा जगण्याची प्रेरणा शक्ती मिळाली यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी गावोगावी हिंदूंना संघटित करून स्त्री शक्तीचा सन्मान आणि जागर करण्यासाठी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नवरात्री मंडळांनी आपापल्या गावात श्रीदुर्गामाता दौड काढावी व दौडचे नियोजन करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन धारकरी करत आहेत. सर्व माहितीसाठी जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील 94044 58417 यांच्याशी संपर्क करावा.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles