सावंतवाडी : जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली तडकाफडकी झाली नाही. त्यांच्या आरोग्य प्रश्नांमुळे एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पत्र दिले होते असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, जलसंपदा अधिक्षक अभियंता विजय थोरात उपस्थित होते.
पत्रकारांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची मालवण राजकोट किल्ल्यावरील शिव पुतळा प्रश्नांमुळे तडकाफडकी बदली झाली आहे , याबाबत विचारणा केली असता मंत्री केसरकर बोलत होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सिंधुदुर्ग जिल्हयाची खडानखडा माहिती होती. त्यांनी आंबोली, चौकुळ व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर सुस्पष्ट अहवाल सादर केले. तसेच शिव पुतळा दुर्घटना घडली त्याच्या चौकशीला सहकार्य केले. ते तळमळीने काम करत होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा आजार असल्यामुळे एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलीसाठी पत्र दिले होते.


