Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘कांतारा चॅप्टर 1’ चा धुमाकूळ! छावा-सैयाराचाही मोडला रेकॉर्ड! ; वाचा कमाई किती?

मुंबई : कालचा दसऱ्याचा दिवस अनेक अर्थांनी खास होता, दसरा, 2 ऑक्टोबर हे दोन्ही योग काल एकत्र आले. बॉक्स ऑफीससाठी देखील कालचा दिवस महत्वाचा होता. ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाची सगळ्यानांच उत्सुकता होती. पहिलायच दिवशी या चित्रपटाने असं तूफान आणलं की त्यामध्ये या वर्षातील जवळपास सर्वच चित्रपट गुंडाळले गेले. एक चांगला अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या ऋषभ शेट्टीने त्याचं नाणं खणखणीतपणे वाजवत योग्यता सिद्ध केली आहे. त्याने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर त्यांना या चित्रपटाच्या प्रेमात पाडले आहे.

‘कांतारा चॅप्टर 1’ च्या पहिल्या दिवसाच्या आकड्यांवर एक नजर टाकल्यावर तुम्हीही असेच म्हणाल. ॲडव्हान्स बुकिंग प्रक्रियेपासूनच ऋषभ शेट्टीचा चित्रपट खळबळजनक ठरला आहे. रिलीज होण्यापूर्वीच त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. ‘कांतारा चॅप्टर 1’ आणि ऋषभ या दोघांवरील चाहत्यांचे प्रेम सिद्ध झाले असून आधीच मोठ्या प्रमाणात तिकीटं बुक केली जात होती.

कांतारा चॅप्टर 1 चा बॉक्स ऑफिसवर ‘असा’ धुमाकूळ

‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपटाने त्याच्या चाहत्यांना दुहेरी धक्का दिला आहे. पहिले म्हणजे, चित्रपटाने पहिल्या दिवशी मोठी कमाई केली आहे. दुसरे म्हणजे, ऋषभच्या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या वर्षीच्या दक्षिण चित्रपटसृष्टीतील आणि बॉलिवूडमधील देखील टॉप 10 ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. “कांतारा चॅप्टर 1 ” ने जबरदस्त हिट ठरल्याचे दिसत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, “कांतारा चॅप्टर 1″ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी तब्बल 60 कोटी रुपयांची कमाई केली.

60 कोटींचा आकडा पाहून निर्मात्यांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण खूप आनंदी आहेत. आणि येत्या काळात चित्रपट आणखी कमाई करू शकतो.”कांतारा चॅप्टर 1” चित्रपट त्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाने आठ दक्षिण भारतीय चित्रपट आणि दोन प्रमुख बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकले. एकूणच, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी दहा चित्रपटांना मागे टाकले.

‘कांतारा चॅप्टर 1’ ने या 10 चित्रपटांना पिछाडीवर टाकलं –

बॉलीवुड – पहिल्या दिवसाचं कलेक्शन –

“कांतारा चॅप्टर 1″ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी तब्बल 60 कोटी.

छावा – 31 कोटी सैयारा – 21.5 कोटी

साऊथचे चित्रपट – पहिल्या दिवसाचे कलेक्शन

सु फ्रॉम सो – 0.78 कोटी.

महावतार नरसिम्हा – 1.75 कोटी.

संक्रातिकी वस्तुनम – 23 कोटी.

मॅड स्क्वायर – 8.5 कोटी.

ड्रॅगन – 6.5 कोटी.

टूरिस्ट फॅमिली – 2 कोटी.

थोडारम – 5.25 कोटी.

लोका चॅप्टर 1 – 2.7 कोटी.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles