Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

Big Breaking – पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारची मोठी कारवाई.

नवी दिल्ली : बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात यूपीएससीने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचण आली होती. आता मात्र तिला पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार –

पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी माहिती अधिकारी विजय कुंभार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एकदा आयएएस झालं की देशाचे पंतप्रधानदेखील आपल्याला सेवेतून काढू शकत नाहीत या अविर्भावात वागणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही चपराक असेल. पूजा खेडकरप्रमाणेच अनेकांनी खोटी कागदपत्रं सादर करून पदं घेतली आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.

नेमकं प्रकरण काय?

पूजा दिलीप खेडकर 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने 841 वा क्रमांक पटकावला होता. काही महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जिल्ह्यात तिची नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं तिच्याबाबत प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर तिथून वाशिम  इथं बदली करण्यात आली होती. पूजा खेडकरने दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले.

याच आधारावर तिला विशेष सवलत मिळाली आणि ती आयएएस झाली. त्यानंतर तिला सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिली. तसेच पूजा खेडकरनी स्वतःच्या नावात, तिच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकरनी परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles