Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

शिल्पा शेट्टीची तब्बल ४ तासांहून अधिक चौकशी, होऊ शकते अटक?

मुंबई : एका बिझनेसमनची 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे साडेचार तास चौकशी केली. मात्र या प्रकरणात आपण लाभार्थी नसल्याचा दावा शिल्पाने या चौकशीदरम्यान केला. यावेळी तिने सादर केलेल्या कागदपत्रांची पोलीस पडताळणी करत आहेत. शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रावर व्यावसायिक दीपक कोठारी यांची 60 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. राज कुंद्राने 60 कोटींपैकी 15 कोटी रुपये आपली पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यात वळविल्याची माहिती समोर आली होती. परंतु 4 ऑक्टोबर रोजी चौकशीदरम्यान खात्यात कोणतेही पैसे वळविण्यातत आले नसल्याचा दावा तिने केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

2015 ते 2023 दरम्यान ही फसवणुकीची घटना घडल्याचा दावा संबंधित व्यावसायिकाने केला. शिल्पा आणि राजने त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले, परंतु त्याऐवजी त्यांनी ते वैयक्तिक खर्चासाठी वापरलं, असा आरोप कोठारी यांनी केला. आर्थिक गुन्हे शाखेकडून शिल्पा आणि राजच्या प्रवासाच्या नोदींचीही तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे त्यांना देश सोडून जाण्यापासून रोखता यावं, यासाठी लूकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles