नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटी रुपयांच्या दोन नव्या योजना सुरू केल्या आहेत.
▪️ योजना 1 – डाळ स्वावलंबन अभियान:
· ह्या योजनेवर 11,440 कोटी रुपयांचा खर्च –
· 2030-31 पर्यंत डाळींचे उत्पादन 25.23 लाख टन वरून 35 लाख टन पर्यंत वाढवणे
· डाळींच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे
▪️ योजना 2 – पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना:
· ह्या योजनेवर 24,000 कोटी रुपयांची तरतूद
· देशातील 100 मागास जिल्ह्यांमध्ये कृषी क्षेत्राचा कायापालट
· पीक उत्पादन, सिंचन, कर्ज सुविधा यांसाठी सहाय्य.
▪️ अतिरिक्त घोषणा –
· कृषी क्षेत्रातील 5,450 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
· 815 कोटींच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी
· देशभरातील दुग्धप्रकल्प, मत्स्यव्यवसाय प्रकल्प आणि प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन
▪️ कालावधी – ह्या दोन्ही योजना येत्या रब्बी हंगामापासून 2030-31 पर्यंत चालणार आहेत.
▪️ शेतकऱ्यांशी संवाद – यावेळी पंतप्रधानांनी विविध सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि यशस्वी शेतकऱ्यांना पुरस्कारही दिले.
ह्या योजनांमुळे देशातील शेतीक्षेत्राला नवीन चालना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.


