Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं तब्बल दहा वर्षांनी कमबॅक! ; चेटकिणीची भूमिका साकारणार!

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना आपण अनेक कलाकृतींच्या माध्यमातून भेटत आलो आहे. प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळाली आहे. स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेतून कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत.

पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच ‘काजळमाया’ मालिका  –

चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनकदत्ता ही पर्णिकाची आई. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी. कनकदत्ताची आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का? याची उत्कंठावर्धक गोष्ट काजळमाया मालिकेतून पाहायला मिळेल. कनक दत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या की, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनक दत्तला पाहता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. अनेक कंगोरे आहेत या भूमिकेला. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी गूढ मालिका काजळमाया 27ऑक्टोबरपासून रात्री 10.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles