Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दोन वर्षाचा चिमुकला आई-बाबांच्या शोधात चक्क हायवेवर .! ; सामाजिक बांधिलकीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनार्थ टळला.

सावंतवाडी : परप्रांतीय लोकं कामाच्या शोधामध्ये सिंधुदुर्गात येतात मिळेल ते काम करतात परंतु कामाच्या ठिकाणी आपल्या लहान मुलांना नेऊन कुठेही कसेही रस्त्यावर खेळायला सोडून देतात अशा त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या कित्येक लहान मुलांचा दुर्दैवी बळी गेला आहे.
एखाद्याचे मूल गाडीखाली चिरडलं, उखळत्या डांबरामध्ये पडलं, दगडान खाली दबलं तर एखाद्याचं मूल दरीत पडलं, तर मुलाला साप चावला तर कोणाच्या मुलाला पिसाळलेल्या कुत्र्यांनी फाडून खाल्लं अशा कित्येक दुर्दैवी व भयानक घटना ऐकू येतात त्यावेळी काळजात चर होतं.


परंतु अशी दुर्दैवी घटना घडल्यावर पाषाण काळजाचे काही परप्रांती माता- पिता अवघ्या दहा ते वीस हजार रुपया मध्ये संबंधित व्यक्तीशी सेटलमेंट करून गावी निघून जातात व काही दिवसानंतर प्रकरण थंड झाले की पुन्हा कामावर रुजू होतात.
काल एक अशीच घटना घडली ती म्हणजे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची कार्यकर्ती सपना असनियेकर बांदा येथे जात असताना. इन्सुली लाटीच्या पुढे दोन वर्षाचं लहान मूल हायवेच्या मध्यभागी रडत उभ असताना तिने पाहिलं व स्कुटी थांबवून त्या मुलाकडे धावत गेली व मुलाला हायवेच्या बाजूला आणलं त्यावेळी त्या मुलाच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं ते मोठमोठ्याने रडत होतं त्यानंतर त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली व त्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध सुरू झाला जवळपास अर्ध्या तासानंतर सदर मुलाचे आई-वडील त्या ठिकाणी आले. संतप्त नागरिकांनी त्या मुलाच्या वडिलांना जाब विचारला त्याने उद्धटपणे उत्तरे दिली असता जमलेल्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला व सदर प्रकार पोलिसांच्या कानी घातला . पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन सदर इसमाला समज दिली. परंतु असे प्रकार वारंवार होत असतात त्यावेळी त्यामुळे पोलिसांनी ठेकेदार व अशा निष्काळजी वृत्तीच्या आई-वडिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव यांनी केली आहे.
सदर जमलेल्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची कार्यकर्ती सपना असनीकर हिच्या सतर्कतेमुळे फार मोठा अनर्थ टाळला. जमलेल्या नागरिकांकडून तिचे कौतुक करून आभार मान्यत आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles