Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

आईच्या वाढदिवशीच लॉटरी!, भारतीय तरुणाने जिंकले तब्बल 240 कोटी! ; ‘या’ देशातील सर्वात मोठा जॅकपॉट!

अबुधाबी : कुणाचं नशीब केव्हा पालटेल हे सांगता येत नाही. अचानक रंकाचा राजा होण्याची उदाहरणं तशी कमीच आहेत. पण कुणाचं नशीब केव्हा फळफळेल हे सांगता येत नाही. अशाच सुखद अनुभव या भारतीय तरुणाला आला. अबुधाबीत राहणाऱ्या 29 वर्षीय भारतीय तरुण अनिलकुमार बोला याला जॅकपॉट लागला आहे. आईच्या वाढदिवशी त्याला लकी नंबरवरून 240 कोटींची लॉटरी लागली. संयुक्त अरब अमिरातमध्ये त्याने लॉटरी जिंकून इतिहास घडवला आहे. दाव्यानुसार हा या देशातील सर्वात मोठा जॅकपॉट ठरला आहे.

18 ऑक्टोबर रोजी आयोजित लकी ड्रॉमध्ये अनिलकुमार याला 100 दशलक्ष दिरहम म्हणजे जवळपास 240 कोटी रुपयांचे बक्षीस लागले. युएई लॉटरीने समाज माध्यम X वर त्याची एक मुलाखत शेअर केली आहे. त्यात “For Anilkumar, October 18 wasn’t just another day, it changed his life forever!” असे म्हटले आहे. जेव्हा त्याला धनादेश सोपविण्यात आला. तेव्हा त्याचे हृदय भरून आले. त्याचे डोळे पानावले. आईच्या आठवणीने टचकन डोळ्यात पाणी आले.

आईचा वाढदिवस ठरला ‘लकी नंबर’ –

अनिलकुमारने सांगितले की, त्याने लॉटरी जिंकण्यासाठी कोणतीही खास रणनीती आखली नाही. त्याने केवळ एक साधा पर्याय निवडला. त्याने शेवटचे क्रमांकाला त्याच्या आईची जन्मतारीख नोंदवली. हाच नंबर त्याचासाठी जादुगार ठरला. त्याचे जीवन बदलले. मी कोणतीही जादू केली नाही. केवळ आईची जन्मतारीख निवडली. आईचे आशीर्वाद कामाला आले अशी प्रतिक्रिया त्याने दिली. आईच्या आठवणीने तो भावूक झाला. आईला आता युएईला आणण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली.

240 कोटींचे काय करणार?

जिंकलेल्या 240 कोटींचे काय करणार असे विचारले असता, ही रक्कम विचारपूर्वक खर्च करणार असल्याचे त्याने सांगितले. मी गुंतवणूक आणि कुटुंब या दोन्ही विषयी विचार करत आहे. तर या रक्कमेतील एक वाटा समाजाच्या कल्याणासाठी खर्च व्हावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली. तो त्याच्या कुटुंबाला युएईला आणू इच्छित असल्याचे त्याने सांगितले. या पैशातून एक सुपरकार तर खरेदी करणारच असे त्याने सांगितले. लॉटरी जिंकल्याचा आनंद एखाद्या 7-स्टार हॉटेलमध्ये साजरा करणार असल्याचे त्याने सांगितले. गेल्या महिन्यात दुबईत राहणाऱ्या भारतीयाला अशीच लॉटरी लागली होती. उत्तर प्रदेशातील संदीप कुमार प्रसाद याला 15 दशलक्ष दिरहम (जवळपास 35 कोटी) इतकी लॉटरी जिंकली होती. दोन भारतीयांना दोन मोठ्या लॉटरी लागल्याची सध्या आखाती देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles