Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार, समुद्री विकासासाठी तब्बल ₹१६,५०० कोटींची गुंतवणूक! ; *मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना.

मुंबई : महाराष्ट्राने समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्ट्स ग्रुप सोबत महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा करार एखाद्या राज्यासोबत.आणि तेही मत्स्य व बंदरे विकास खात्यामध्ये होत असल्याने हा करार विशेष ठरला आहे.


या करारामुळे महाराष्ट्रात समुद्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे दरवाजे उघडणार आहेत. तब्बल 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ₹16,500 कोटींची गुंतवणूक विविध क्षेत्रात होणार आहे. जहाजबांधणी, शिप-ब्रेकिंग, वॉटर ट्रान्सपोर्ट, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर विकास, स्पोर्ट्स मॅनेजमेंट इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे.
मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे हा करार प्रत्यक्षात साकार झाला असून, राज्याच्या सागरी विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या करारामुळे रोजगारनिर्मिती, तांत्रिक प्रगती आणि निर्यातीला नवे आयाम प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles