Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाही! : मंत्री उदय सामंत. ; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकविण्यासाठी आम्ही सज्ज!

सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा किंवा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. दीपक केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाही. केसरकरांची शांतता वादळापूर्वीची आहे. नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असणार आहे. त्यांच्यासारख नेतृत्व निलेश राणे करत आहेत. आताच पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने आलो. कुणाला कमी लेखण्याच काम होणार नाही. पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आराखडा असल्यास तो द्यायचेही आवाहन केलं, त्याच स्वागतही करू. मात्र, शिवसेनेला कमी लेखू नये, असे आवाहन शिवसेना संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

सावंतवाडी येथील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, संजय आंग्रे, अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, दिनेश गावडे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, हर्षद डेरे, सुनिल डुबळे, अनारोजीन लोबो, भारती मोरे, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, प्रेमानंद देसाई, परिक्षीत मांजरेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. सामंत पुढे म्हणाले, केसरकर पायानं मारतात ती गाठ हातानं सुटत नाही. महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे. वाईट घडू नये म्हणून एकनाथ शिंदे देखील पुढाकार घेत आहे‌. मात्र, महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी आपली पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम असलं पाहिजे. संजू परब यांसारखा सतर्क पदाधिकारी असल्यास संघटना निश्चित वाढणार आहे. दुसरीकडे निधीची मोठी ताकद दीपक केसरकर यांनी उभी केली आहे. नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला जिल्हा आम्ही बघितला. तीच माणसं आज निलेश राणेंच्यामागे उभी आहेत. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सिंधुदुर्गची ओळख राज्यात होईल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत आपला भगवा झेंडा फडकला पाहिजे. आम्ही संयमी आहोत. एक घाव, दोन तुकडे करणार नाही. संपर्कमंत्री म्हणुन बोलयच कोणाशी हा देखील प्रश्न पडतो. कारण, त्यापूर्वीच मैत्रीपूर्णची विधान होतात हे यानिमित्ताने सांगू इच्छितो. महायुती झाल्यास सन्मान राखला गेला पाहिजे. हा मेळावा आदेशाचा आहे असं समजावं. शिवसेनेचा उमेदवार असणार अशी भुमिका घेऊन कामाला लागा, प्रचारास सुरुवात करा असे आवाहन शिवसेना संपर्क मंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल. तर नारायण राणेंसारख नेतृत्व निलेश राणे करत आहेत. आताच पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने आलो. कुणाला कमी लेखण्याच काम होणार नाही. पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा आराखडा असल्यास द्यायचेही आवाहन केलं, त्याच स्वागतही करू. मात्र, शिवसेनेला कमी लेखू नये. मित्रपक्षानं आमचा सन्मान केला पाहिजे ही भुमिका आहे. ”हम किसी से कम नही” केसरकरांनी फक्त लढ म्हणावं, आम्ही तुमच्या आशीर्वादान लढू, विरोधकांच डिपॉझिट जप्त होईल असे उमेदवार उभे करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सिंधुदुर्गात येणार आहेत अशी माहिती श्री सामंत यांनी दिली.

माजी मंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, युतीत मिठाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही. मात्र, स्थानिक पातळीवर वेगळी विधान येतात. तोडायच असेल तर आमच्याकडून तुटलं असं नको. मैत्रीचा धर्म आम्ही जाणतो. सोबत आले तर सोबत. अन्यथा, त्यांच्या शिवाय लढावं लागेल. महायुती झाली तर ती वेळेत झाली पाहिजे‌. नारायण राणे आमचे खासदार आहेत. त्यांनाही मान दिला गेला पाहिजे. महायुती न झाल्यास दुसऱ्याला संधी मिळता नये याचीही काळजी घेतली पाहिजे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे‌. तुमच्या प्रचाराला मी फिरणार आहे असे सांगितले.

सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत आपली ताकद आहे. त्यामुळे थांबायची वेळ गेली. हीच ती वेळ आहे, तुम्ही तयारीला लागा. सावंतवाडी, कुडाळवर डोळा आहे. आपली किंमत मैदानात दाखवून द्या, गप्पं बसण्याचे दिवस नाहीत असं मत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.
तिनं पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. आपल्या ताकदीला कोणी नाकारू शकत नाही. आमचे नेते युतीचा निर्णय घेतील. मित्रपक्षाची विधान बघता दोन दिवसांपूर्वी आम्ही स्वबळाचा नारा दिला. माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त लक्ष आहे. आपली ताकद दाखवून द्यायची ही निवडणूक आहे. आपण नंबर १ आहोत ही दाखवुन द्यायची ही वेळ आहे. तसेच कुंपणावर उभं असणाऱ्यांना कधी घ्यायचं सांगा, आपला हॉल हाऊसफुल्ल होईल. फक्त, केसरकरांनी ग्रीन सिग्नल द्यावा, समोर काही शिल्लक ठेवणार नाही असा विश्वास व्यक्त केला‌.

दरम्यान, माजी आमदार राजन तेली म्हणाले, लढाईसाठी सैनिकांनी तयार असल पाहिजे ही नारायण राणेंची शिकवण आहे. त्यामुळे आम्हीही तयारीत आहोत. जर कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यावं लागेल. निलेश राणेंची भुमिका स्वागतार्ह आहे. उद्या जिल्हा बँकेचीही सत्ता शिवसेना स्वबळावर आणू शकते असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला. मला आजही कोणतीही नोटिस आलेली नाही. नोटीसीला घाबरून पळणारा मी नाही. माझी लढाई चालूच राहील. आताची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. वेगळं लढण्याची इच्छा नव्हती. युती म्हणून आमची भूमिका असताना समोरून स्वबळाचा नारा दिला जातोय. ऐनवेळी युती न झाल्यास करायचं काय ? आपण तयार असल पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केल. जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, माझ्या पाठिशी सर्वजण आहेत. त्यामुळे आम्हाला जिंकण्यासाठी लढायच आहे असा विश्वास व्यक्त केला. दीपक केसरकर यांनी कोट्यवधींचा निधी दिलाय, काम केलीत. याचा फायदा पक्षाला होत आहे. मंत्री उदय सामंत यांनी देखील असच लक्ष आमच्यावर ठेवावं असं मत संजू परब यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमानंद देसाई यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles