Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

निवडणूक लागताच भाजप ॲक्शन मोडमध्ये! ; ‘ह्या’ नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी!, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नितेश राणे निवडणूक प्रभारी.

मुंबई : गेल्या काही काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगानं 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच गणेश नाईक यांना निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. ठाणे शहर, ग्रामीण, कल्याण, मीरा भाईंदर, नवी मुंबईची जबाबदारी गणेश नाईक यांच्याकडे असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे निवडणूक प्रभारी तर पुणे ग्रामीण मध्ये गणेश बिडकर यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच सोलापूरमध्ये मंत्री जयकुमार गोरे, छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे, नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण हे निवडणूक प्रभारी असणार आहेत.

त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक, नाशिकमध्ये गिरीश महाजन, रायगडमध्ये प्रशांत ठाकूर, जळगावमध्ये संजय सावकारे, अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, रत्नागिरीत निरंजन डावखरे, साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि पुणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे हे निवडणूक प्रभारी असणार आहेत.

राज्यात निवडणुकीसाठी पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये 246 नगर परिषदेमध्ये दहा नव्या नगर परिषदांचा समावेश आहे तर 42 नगर पंचायतींमध्ये 15 नव्या नगर पंचायतींचा समावेश आहे. एकूण 6 हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.

महत्त्वाच्या तारखा –

  • नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात- 10 नोव्हेंबर 2025
  • नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर 2025
  • नामनिर्देशन पत्राची छाननी- 18 नोव्हेंबर 2025
  • अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रावर माघारीची अंतिम मुदत- 21 नोव्हेंबर 2025
  • अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर 2025
  • मतदानाचा दिवस- 02 डिसेंबर 2025
  • मतमोजणीचा दिवस- 03 डिसेंबर 2025

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles