विशाल परब हे जनसेवेचा ध्यास घेतलेलं नेतृत्व! : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. ; परबांचं संपर्क कार्यालय म्हणजे जनसामान्यांचं हक्काचं दालन! – जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.

सावंतवाडी : सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं युवा नेतृत्व म्हणजे विशाल परब आहेत. आज त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. हे कार्यालय भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी हक्काचे दालन ठरणार असून जनसामान्यांच्या प्रश्नांना येथे नक्कीच न्याय दिला जाईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.

सावंतवाडी येथील मोरडोंगरी परिसरात अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात असलेले विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री नितेश राणे, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब, सौ. वेदिका परब, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, बाबा मोंडकर, सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, सुजाता पडवळ, गेळे सरपंच सागर ढोकरे, विराग मडकईकर, केतन आजगावकर, प्रसन्ना देसाई, राजन गिरप, संध्या तेरसे, गुरुनाथ पेडणेकर, मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर, कट्टर राणे समर्थक संतोष गांवस, अमित परब, प्रतीक बांदेकर, विक्रांत सावंत, मायकल डिसोजा, पुंडलिक कदम यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले विशाल परब यांच्या माध्यमातून भव्यदिव्य अशा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय योजना तसेच विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध मार्गदर्शन पुरविले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसामान्यांना येथे सोई सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी भाजपा युवा नेते विशाल यांनी परब यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles