Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

बौद्ध महासभा आयोजित ‘राष्ट्रीय धम्म सहल एक अलौकिक अनुभूती!’ – ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांचा विशेष लेख.

अनेकदा इतिहास आणि भूगोल कधी एकत्र नांदत नसतात, हा अनुभव आहे. जेव्हा इतिहास घडतो तेव्हा भूगोल नष्ट होतो. भारतातील बौद्ध स्थळांच्या इतिहासाचा आढावा घेतानाही असेच म्हणावे लागेल. खरंतर या भूमीत जन्म झालेला आणि उदयास आलेला, जगभर विखुरलेला खरा धम्म हा बौद्ध धर्म. पण या धम्मावर जसजशी आक्रमणे झालीत तसा हा धम्मच नष्ट  करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. आज भारतभूमीला बुद्धभूमी म्हणून पाहिली जाते. इथल्या मातीला सुगंध आहे, तो जगभर दरवळतो. म्हणूनच भारतातील पवित्र माती म्हणून परदेशात नेली जाते. मात्र या भूमीकडे भारतीयांचं अद्याप लक्ष नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल.

पर्यटन हा एक जागतिक उद्योग आहे पर्यटनामुळे आपली संस्कृती, आपला इतिहास, उद्गत गत होतो आणि म्हणूनच ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा दरवर्षी बौद्ध स्थळांच्या दर्शनासाठी राष्ट्रीय पर्यटन सहलींचे आयोजन करत असते. यावर्षी या सहली त सिंधुदुर्ग जिल्हाने सहभाग घेतल्याने या सहलीत सुमारे 50 पर्यटकांनी सहभाग घेतला होता. बौद्ध महासभेचे अभ्यासू जिल्हाध्यक्ष आनंद कासारडेकर धडपडे सरचिटणीस संजय पेंडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत या सहलीत 84 वर्षाच्या सुलोचना मोरे आजी तर तेरा वर्षाची स्पृहा असे असे 50 पर्यटक सहभागी झाले होते.

सहलीची सुरुवात सोमवारी अगदी भल्या पहाटे पावणेचार वाजता कणकवली पासून मंगला एक्सप्रेसने करण्यात आली. आणि मंगळवारी सकाळी 21 रोजी आग्रा टेशन वर हा आमचा पहिला रेल्वेचा प्रवास समाप्त झाला. येथून लक्झरीने खऱ्या अर्थाने प्रवासाची सुरुवात झाली आग्रा येथे हॉटेल चाणक्य येथे मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी मुक्काम करून सर्वप्रथम आम्ही जागतिक आश्चर्य असणाऱ्या ताजमहालची सर्वांनी सफर केली.

आग्रा येथे मुक्काम करून सकाळी आठ ते दहा तासांचा प्रवास करून श्रावस्ती येथे द्वारी 22 रोजी दुसरा मुक्काम केला तेथे कोरियन गेस्ट हाऊस या प्रशस्त जागेत मुक्काम केला. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सुमारे 12 हेक्टर मध्ये उभारलेल्या भव्य दिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कची यावेळी पाहणी केली भव्य दिव्य या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क चित्र भवन सर्वांचे डोळे तृप्त झाले..आणि तिथून सकाळी 23 रोजी नेपाळच्या लुंबिनी शहराकडे अर्थात भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मस्थळाची पाहणी करण्यासाठी प्रस्थान केले. सुमारे आठ तासांचा हा प्रवास करून भारत नेपाळ सीमेवर रात्र दहाची बॉर्डर बंद होता होता आम्ही प्रवेश केला. त्यामुळे फारसे तपासन्या न होता आम्हाला शेवटचा प्रवेश मिळाला .त्यामुळे जोशी हॉटेल मुक्काम झाला. तेवीस रोजी लुंबिनी परिसरात असणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ आणि त्याच परिसरात असणारी विविध देशांची सुरेख विहारे यांची पाहणी करून दुपारी तेथे जेवण करून आमचा मुक्काम कुशीनगर कडे प्रस्थान झाला.

गुरुवारी 23 रोजी रात्री कुशीनगरच्या चंद्रमणी बुद्ध विहारात मुक्काम करून सकाळी भगवान गौतम बुद्ध यांचे महानिर्वाण झाले त्या स्थळाला भेट दिली आणि तेथून वैशालीकडे प्रस्थान करण्यात आले यावेळी हॉटेल उत्कर्ष इंटरनॅशनल या नावाच्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आमचा 24 चा मुक्काम झाला. शनिवारी 25 रोजी सकाळी उठून वैशाली परिसरातील विविध देशांची विहार पाहून दुपारनंतर राजगिरीकडे प्रस्थान केले. रविवारी 26 रोजी राजगिरी परिसरातील वेणुवन, डुंगेश्वर डोंगर इत्यादींची पाहणी करून सोमवारी 27 रोजी बुद्धगया येथील हॉटेल संघमित्रा येथे मुक्काम 27 रोजी सकाळी बोधगाव येथील प्रसिद्ध महाविहार भगवान गौतम बुद्ध ज्ञान प्राप्त झाल्या, त्या पिंपळाचे दर्शन इत्यादींची पाहणी करून 28 रोजी सारनाथ या ठिकाणी प्रस्थान करण्यात आले.

सारनाथ या प्रसिद्ध ठिकाणी सुमारे एक हजार मीटर उंच असलेल्या डोंगर माथ्यावर उभारण्यात आलेल्या जागतिक शांती स्तूपाची पाहणी करून भगवान गौतम बुद्ध यांनी ज्या ठिकाणी तब्बल सहा वर्ष ध्यान साधना केली त्या शक्ति स्थळांची हे पाहणे करण्यात आले येथे जाताना पाळण्यात बसून अनेकांनी आनंद व्यक्त केला तर काहींनी पायी दल मजल करीत हे स्थळ गाठल. मात्र या स्थळांची पाहणी केल्यानंतर अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी कोणत्या अवस्थेत पोहोचले असतील याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. शिवाय तब्बल सहा वर्षे त्यांनी ध्यान धारणा केली ती गुहा म्हणजे एक आश्चर्यच म्हणावा लागेल त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेणे हे एक मोठी अचंबित करणारी घटना होती. या दहा दिवसांच्या प्रवासात बसमध्ये भीम गीते ,शेर शाहिरी ,जोक ,भेंड्या अशा अनेक मनोरंजनात्मक मेजवानी होती तर जिल्हाध्यक्ष आनंद कासारडेकर यांची प्रत्येक स्थळांची सूक्ष्म माहिती देणाऱ्या अभ्यासपूर्ण व्याख्यान हे जोडीला असल्याने ट्रीप खूपच चांगली झाली शिवाय केंद्रप्रमुख आयु रामचंद्र वालावलकर यांचा सूत्रसंचालन आणि मध्ये मध्ये संदेश, जोक , मी मी क्री यामुळे ही धम्म सहल अनेकांच्या स्मरणात राहिल हे विशेष. विशेष म्हणजे तीन दिवसांचा रेल्वे प्रवास दहा दिवसांचा बस प्रवास हा मोठा पल्ला असतानाही सर्व सहभागी पर्यटकांनी तो लीलया पेलल्याने फारसा त्रास कोणाला झाला नाही. प्रवासात भोजन व्यवस्था ही घरगुती ठेवण्यात आल्याने एकूणच ही धम्म सहल अनेकांच्या कायम स्मरणात राहील हे निश्चितच .या सहलीचे खऱ्या अर्थाने नेतृत्व मालवण तालुक्याकडे असल्याने संजय पेंडूरकर आणि त्यांचे सहकारी विलास वळंजु, सूर्यकांत कदम ,अमित पवार, रविकांत कदम आणि त्यांच्या सहकात्यांनी केलेले अथक प्रयत्न हे या सहलीचे प्रेरणा देणारे होते. शिवाय सर्वांचे स्वयंपाकी शाली आचरेकर , व सदाशिव जाधव यांच्या परिश्रमामुळेच ही धम्म सहल अपेक्षेपेक्षा खूप यशस्वी ठरली.

मुंबई पोलिसात उपनिरीक्षक पदावर असलेले आणि सहलीत सहभागी झालेले महेंद्र जाधव असतील, नाशिकचे रहिवासी असणारे प्रभाकर अहिरे दांपत्य, कणकवलीचे रामचंद्र तांबे आणि हरकुलचे सिताराम इत्यादी ज्येष्ठ सहभागी झाले होते.

या सहलीचे छान वाढवली ती गायिका ममता जाधव, अपूर्वा पवार, स्नेहा पेंडूरकर, गायक विलास पळंजु, अनंत कदम, महेंद्र जाधव, आनंद कासार्डेकर , मिलिंद सोनावडेकर, लक्ष्मण कदम इत्यादींनी या विशेष सहलीत आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले. शेवटी पत्रकार मोहन जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजकांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम पार पडला.

त्यावेळी सहलीत सहभागी झालेल्या महेंद्र जाधव यांना तर प्रतिक्रिया देताना गहिवरून आले. यातूनच सहलीची यशस्वीता स्पष्ट होते आणि पुन्हा लवकरच अशाच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ही सहली आयोजित कराव्यात याबाबतचा अनेकांनी आग्रही धरला .एकूणच सहल खूप चांगली आणि यशस्वी झाली. त्याचे सर्व श्रेय आयोजकांना निश्चितच देता येईल. मात्र येताना भर पावसात सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला बसमधून परतीचा रात्री आठ वाजता भरपावसात पंडित दीनदयाळ जंक्शन विसावला. मात्र रात्री आठ ते सकाळी चारपर्यंत स्टेशनला गाडीच नसल्याने हतबलतेने स्टेशनवरच बसून होतो. मात्र पहाटे गुरुवारी चार वाजता सुरू झालेला आमचा हा प्रवास शनिवारी सकाळी दहा वाजता सावंतवाडीत अपेक्षित होता. मात्र फक्त सावंतवाडीत थांबणारी ही ट्रेन केवळ सावंतवाडीतच न थांबता जिल्ह्यातील प्रत्येक स्टेशन वैभववाडी ते झारापर्यंत सर्वच स्थानकात थांबत रात्री दहा वाजता सावंतवाडीत आल्याने तब्बल तीन दिवसाच्या हा प्रवास सर्वांनाच डोकेदुखीचा ठरला. मात्र तरीही पर्यटन ऊर्जा प्रत्येकाच्या नसा नसात भरल्याने हा त्रासही सर्वांनी लीलया पेलला. त्यामुळे आपला आनंद द्विगुणीत केला. पण ही धम्म सहल स्मरणात राहील हे मात्र निश्चित!

जय भीम.!

  • ✍️ मोहन जाधव (सावंतवाडी) 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles