सावंतवाडी : येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी व ज्युनिअर मिल्खा सिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या कु. कबीर नवीद हेरेकर याने नुकतेच बेळगावी कर्नाटक येथे बेळगावी हिली रन व गोवा पोंडा येथे पार पडलेल्या डॉ. रमाणी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत ह्या दोन्ही स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी बजावली असून अगदी वयाच्या १० व्या वर्षी ५ किलोमीटर ते २५ किलोमीटर च्या चक्क ४५ मॅरेथॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल काल दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ बेळगावी व आरोग्य मित्र बेळगावी तर्फे आयोजित केलेल्या हेल्थ अँड फिटनेस एक्स्पो मध्ये ” हॉल ऑफ फेम ” म्हणून गौरविण्यात आले. कबीर चा विशेष सत्कार बेळगावी जिल्ह्याचे सुप्रिंटेंडट ऑफ पोलिस डाॅ. भिमा शंकर गुलेड यांच्या हस्ते करण्यात आले. एवढेच नव्हे तर १६ नोव्हेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ बेळगावी यांनी आयोजित केलेल्या रोटरी हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या ब्रॅंड अम्बेसडर म्हणून कबीर हेरेकर याची निवड करण्यात आली आहे.

कबीर सावंतवाडी येथील ” सिंधु रनर्स ” टीमच्या श्री. ओंकार पराडकर, डॉ. स्नेहल गोवेकर व जाॅन्सन सर यांच्या कडून प्रशिक्षण घेत आहे . कबीरच्या य कामगिरी बद्दल ” सिंधु रनर्स ” च्या पुर्ण टीम कडून अभिनंदन करण्यात आले आहे.


