अलीगड : सध्या एक अजब प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी आलेल्य पाहुण्याचा विवस्त्र अवस्थेतील फोटा काढल्याने लग्नघरी थेट कडाक्याचे भांडण झाले आहे. विशेष म्हणजे हे भांडण एवढे टोकाचे होते की त्यात एकाचा खून झाला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार उत्तर प्रदेशातील अलीगड येथे घडला आहे. वरपक्षाकडील पाहुण्याचा एक विवस्त्रावस्थेतील फोटो काढल्यानंतर वधू आणि वराच्या मंडळींमध्ये हा वाज झाला आहे. या भांडणात नवऱ्या मुलाच्या भावाला मारहाण करण्यात आली असून तो गंभीर जखमी झाला आहे. या भांडणात वराच्या चुलत भावाची हत्या झाली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजीची असल्याचे सांगिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील जगतपूर या गावात रणजितसिंह यांची मुलगी निशा हिचा आग्रा येथील अत्मादौला भागातील सीतानगर रामबाग येथील रहिवासी असलेल्या ओमवीर यांचा मुलगा राहुलशी विवाह होणार होता.


