दोडामार्ग : सामाजिक बांधिलकी जोपासून सतत समाजात विविध पद्धतीने मदत करणारे, दानशूर व्यक्तिमत्व, उद्योग क्षेत्रात अनेकांशी जिव्हाळ्याचे स्नेह असलेले जिंदादिल अन् माणुसकीची कास असलेले व्यक्तिमत्व, इंसिग्निया बिल्डर्सचे सर्वेसर्वा तथा यशस्वी उद्योजक मिलिंद परब यांना बाबा टोपले मित्र मंडळाने वाढदिवसाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवा आदर्श उद्योजक तथा सिने व नाट्य अभिनेते दत्ताराम उर्फ बाबा टोपले, दोडामार्ग व भेडशी येथील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यशस्वी उद्योजक मिलिंद परब यांनी बाबा टोपले मित्र मंडळाचे स्वागत करत त्यांचे आभार मानले. वाढदिवसानिमित्त श्री. परब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.



