सोलापूर : वडशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळ वडशिवणे यांच्या वतीने
ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना देण्यात येणारा गावगाडा साहित्य पुरस्कार याही वर्षी देण्यात येणार असून हे 14 वे वर्ष आहे.
यावर्षी 1 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले कादंबरी व कवितासंग्रह साहित्यिकांनी आपले साहित्य,कृतीच्या दोन प्रती, अल्पपरिचय आणि फोटो पाठवून द्यावा. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी 31ऑक्टोबर 2024 पर्यंत आपले साहित्य पाठवून द्यावे.यापूर्वी हा पुरस्कार भागवत बावळे(2011), प्रा. डाॅ. अर्जुन होटकर (2012), सौ.कल्पना दुधाळ (2013), पार्थ पोळके(2014), सतीश दराडे (2015), ऐश्वर्य पाटेकर(2016), रावसाहेब कुंवर(2017), तुकाराम पाटील (2018), दिनकर कुटे (2019), जयदीप विघ्ने (2020), हरिश्चंद्र पाटील (2021), डॉ.कालिदास शिंदे/बाबुराव इंगळे (२०२२), तान्हाजी बो-हाडे (2023) या मान्यवर साहित्यिकांना प्राप्त झालेला आहे.
तरी साहित्यिकांनी आपले साहित्य सोमनाथ मधुकर टकले, मु.पो. वडशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर पिन – 413223, मोबा. 9699760802 या पत्त्यावर पाठवून द्यावे, अशी माहिती विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी दिली. यावेळी दिनेश आदलिंगे, डॉ. जनार्दन भोसले, श्री. दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे आदि उपस्थित होते.


