सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची आज माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी भेट घेतली. ह्यावेळी आशिष सुभेदार, आप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, नाना सावंत, बाळा बहिरे, संतोष सावंत, राहुल गावकर उपस्थित होते.
दरम्यान श्री. उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील महसूल खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच इतर विषयांवर चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच माजी आमदार उपरकर यांनी योग्य विषयांवर आमचे तुम्हाला नेहमी सहकार्य राहील पण ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाकडून चुकीच्या गोष्टी होतील, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेच कामे जर होत नसतील तर त्यावेळी आम्ही उघड बोलू असेही श्री. उपरकर म्हणाले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत चुकीच्या गोष्टींना आम्ही कधी अभय देणार नाही, असे जिल्हाधिकारी आश्वासन दिले.