Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट, काय आहे गुड न्यूज ?

मुंबई : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचालाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत या प्रक्रियेची मदत वाढवण्यात आल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला. मात्र असं असलं तरी नोव्हेंबर महिन्याचे 24 दिवस उलटूनही महिलांच्या खात्यात यावेळचे 1500 रुपये काही जमा झालेलेल नाहीतहा महीना संपायला अवघे 5-6 दिवस उरलेत, तरी त्यांच्या नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत काहीच तपशील कळत नव्हतेत्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आता या लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आली असूनत्यांना आता डबल गिफ्ट मिळणार आहे.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे अद्याप न मिळाल्याने चिंतेचं वातावरण होतंत्यातच स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांची तारीख घोषित झाल्याने आचारसंहिताही सुरू आहेत्यामुळे नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणारआत्ता मिळणार की नाहीअसे अनेक प्रश्न महिलांच्या मनात घुमत होते. पण आता काळजीचं कारण नाही. माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नाही अशी माहिती समोर आली आहेतसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ना डबल गिफ्ट मिळणार आहेप्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

त्यानुसारनोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर उशीरा जमा झाला तर, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहेत्यामुळेच लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात ‘डबल गिफ्ट’ मिळण्याची शक्यता वाढली आहे.

ई-केवायसी बंधनकारक –

पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि पैसे मिळवण्यासाठी आता ईकेवायसी करणे अनिवार्य आहेही प्रक्रिया पूर्ण केली नाहीतर मिळणारे पैसे रोखण्यात येऊ शकतातईकेवायसी पूर्ण न झाल्यास या योजनेचा आत्तापर्यंत लाभ घेणाऱ्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाहीसलाडप्टेंबर महिन्यात ई-केवायसीची घोषणा करण्यात आली होतीत्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होतीमात्र तोपर्यंत लाखो महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले नव्हेतविविध कारणांमुळे ते रखडले होतेत्यामुळे आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली असून आता पात्र महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहेतोपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles