Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

सुज्ञ सावंतवाडीकरांनी सजग राहून विरोधकांचा डाव हाणून पाडावा! : आ. दीपक केसरकर. ; ॲड. निता सावंत-कविटकरांसह शिवसेनेच्या उमेदवारांनाच करावे मतदान!

सावंतवाडी : सद्या माझी तब्येत ठीक नसल्याने प्रचाराला बाहेर पडू शकत नाही. याचा फायदा घेऊन चुकीची वक्तव्य होत असतील तर ते योग्य नाही‌. कुणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर ह्याच आहेत, सुज्ञ सावंतवाडीकरांनी आजपर्यंत जशी मला साथ दिली तशीच साथ सावंतवाडी शहराच्या विकासासाठी यापुढे देखील द्यावी, असे मत माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.जेव्हा माझ्या विरोधात कटकारस्थान होत तेव्हा सावंतवाडीकर माझ्या मागे उभे राहतात. मी आजारी असताना गैरफायदा घेत असतील तर ते नैतिकदृष्ट्या चुकीच असल्याचे विधान त्यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, युती झाली असती तर मी राजघराण्याला पाठिंबा दिला असता. आमच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर याच आहेत. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. उमेदवार जनतेला २४ तास भेटणारा समस्या सोडवणारा हवा. सहजासहजी भेटणारा नगराध्यक्ष असावा. यासाठी सावंतवाडीकर योग्य उमेदवाराला विजयी करतील. मी चांगले उमेदवार दिलेत. सर्वस्व अर्पण करून काम करतो‌. त्यामुळे सावंतवाडीकर जनता माझ्यावर प्रेम कायम ठेवतील. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळाला आहे. ते देखील सावंतवाडीत येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच लोकांनी या विधानांना बळी पडू नये. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा सावंतवाडीकर उत्तर देतात. महाराष्ट्रात यूतीच शासन आहे. निधी वाटपाचे सुत्र ठरल आहे. त्यामुळे तो प्रश्न येत नाही. तसेच जिल्हाप्रमुख संजू परब सक्षम आहेत. ते सर्वांचे प्रयत्न हाणून पाडतील असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles