Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीच्या जनतेचे मला आशीर्वाद हिच माझी ताकद! : युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले.

सावंतवाडी : सावंतवाडीतून निवडणूक लढण्याची संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, युवराज लखमराजे भोंसले यांचे आशीर्वाद मला आहेत. सावंतवाडीकरांनी मला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला, असे मत नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले.

येथील जनता मला आशीर्वाद देत आहे. हिच माझी ताकद आहे‌. सावंतवाडीच्या विकासाचे व्हिजन आम्ही घेऊन जात आहोत. राजेसाहेब रघुनाथ महाराज यांनी ड्रेनेज सिस्टीमच नियोजन केलं होतं. आता फिरताना टाऊन प्लानिंग, रोजगार, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन सुविधा वाढवण्यासाठी माझा भर राहिल. माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट मध्ये झालय. त्यामुळे येथील रोजगार वाढवण्यासाठी माझा भर राहणार आहे. महिला, युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी माझा भर असेल. येथील उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान देण्यासाठी देखील माझा भर असेल‌, असं मत त्यांनी व्यक्त केले.

मी सावंतवाडीची सुन असल्याचा अभिमान आहे‌. राजघराण्याचा वारसा मी पुढे घेऊन जात आहे‌. सावंतवाडीची मुलगी, सुन म्हणून मला लोकांनी स्वीकारल आहे‌‌. राजकारणात मी नवीन आहे. पण, विकसीत सावंतवाडी माझी जिद्द आहे‌. भाजपच्या आशीर्वादाने पाच वर्षांत सावंतवाडीचा कायापालट करून दाखवणार, आमच्या उमेदवारांना विजयी करा, असं आवाहनही युवराज्ञी यांनी केलं. ‌

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles