Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

बापरे!, बर्थडे बॉयलाच पेटवलं, नेमकं काय घडलं? ; CCTV पाहून उडेल थरकाप!

मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली एका मित्रावर अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत अब्दुल रहमान नावाचा २१ वर्षीय तरुण गंभीररित्या भाजला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी इमारतीमध्ये राहणाऱ्या अब्दुल रहमानचा सोमवारी (२५ नोव्हेंबर) २१ वा वाढदिवस होता. रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याचे पाच मित्र त्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी इमारतीखाली बोलावले. मित्रांनी सोबत केकही आणला होता. अब्दुलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल खाली आल्यानंतर त्याचे पाच मित्र अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान, आणि शरीफ़ शेख यांनी सुरुवातीला केक कापला. त्यानंतर अब्दुलवर अंडी आणि दगड फेकले. यावरच न थांबता या मित्रांनी स्कूटीवरुन एका बाटलीत आणलेला ज्वलनशील पदार्थ आणला होता. तो अब्दुलच्या अंगावर टाकला आणि त्याला आग लावली. अचानक आग लागल्याने अब्दुल रहमानने आपले कपडे काढून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो भाजला. जखमी झालेल्या अब्दुल रहमानला तातडीने जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना सोसायटीमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद झाले आहे.

पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल

पीडित अब्दुल रहमानने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर विनोबा भावे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान, शरीफ़ शेख या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि कलम ३ (५) अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने या पाचही आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास विनोबा भावे पोलीस करत आहेत. आरोपींनी अब्दुलवर टाकलेला ज्वलनशील पदार्थ नेमका काय होता, याची पोलीस पडताळणी करत आहेत. हा गुन्हा केवळ वाढदिवसाच्या मस्करीतून झाला की यामागे काही कटकारस्थान होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles