Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीतील भाजपाच्या सभेने वातावरण चांगलेच फिरले!, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंनी युवराज्ञी श्रद्धाराजेंचं केलेलं कौतुक मतदारांना भावले!

✍️रूपेश पाटील. 

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. अशातच सावंतवाडीत मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीची ‘शहर विकासाचा महासंकल्प’ या टॅग लाईन खाली जंगी सभा सावंतवाडीच्या ऐतिहासिक गांधी चौकात झाली. या सभेत सर्वात जास्त मने जिंकली ती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्थातच सावंतवाडीच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी.. जेव्हापासून युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सातत्याने अनेक जणांनी त्यांच्या मराठी बोलण्यावरून टीका केली. मात्र या सभेत अत्यंत खणखणीत, मृदू आणि मितभाषी स्वरात त्यांनी केलेले मराठीचे भाषण तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हृदयात घर करून गेले. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या विकासात्मक दृष्टीकोनातून भविष्यातील साकारत असलेली सुंदरवाडी अर्थातच विकासाचे व्हिजन घेऊन त्यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात होणारा विकास आणि त्यांनी मांडलेले विकासाचे रोल मॉडेल हे नक्कीच नव्या विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे.

 

“मी सावंतवाडीची सून आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे!” ह्या त्यांच्या वाक्याने उपस्थितांना आपसूक टाळ्या वाजण्यास भाग पाडले. फक्त एवढेच नव्हे तर “माझे शक्तिस्थान असलेल्या युवराजांना माझा सस्नेह नमस्कार!” हा त्यांचा आपुलकीयुक्त आदर एक आदर्श गृहिणीचं दर्शन देऊन गेला. खऱ्या अर्थाने श्रद्धाराजेंनी ही सभा तर जिंकलीच, शिवाय त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जनतेच्या नजरेतून पूर्णतः खालसा करून टाकले.

या सभेदरम्यान श्रद्धाराजेंबद्दल अनेकांनी भरभरून कौतुक केले. सभेची सुरुवात करून देणाऱ्या भाजपाच्या महिला रणरागिणी श्वेता कोरगावकर यांनी श्रद्धाराजेंबद्दल जे आपले स्वानुभव व्यक्त केले ते सुद्धा श्रद्धाराजे यांच्या स्वभावाची पावती देणारे आहेत. स्वतः श्रद्धाराजे या अत्यंत मितभाषी असून सरळ, स्वच्छंदी आणि प्रांजळ स्वभावाच्या आहेत, याचे दर्शन त्यांना ज्यांनी अनुभवले आहे त्यांना नक्की झाले आहे.

या सभेत दस्तरखुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी मराठी शिकण्यासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले मेहनत घेत आहेत‌. कमी काळात त्यांनी घेतलेली मेहनत बघता पुढच्या पाच वर्षात त्या शहराचा कायापालट करतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. आमच्या पॅनेलमध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर देखील आहेत. संपूर्ण पॅनल बघता यापेक्षा चांगले उमेदवार असू शकत नाहीत‌. सावंतवाडीकर म्हणून पाच वर्ष नेतृत्व कोण करणार, समस्या कोण सोडवणार, १८ प्रकारच्या नागरिक सुविधा देण्याची क्षमता कोणात यांचा विचार करून मतदान करा असे आवाहन केले. पालकमंत्री नितेश राणे यांनी श्रद्धाराजे आणि राजघराण्याचे तोंड भरून कौतुक केले ते पुढे म्हणाले, ही निवडणूक सावंतवाडीच्या अस्मितेची, स्वाभिमानाची आहे‌‌. युवराज्ञी व राजघराण्याच अतुट नातं आहे. शहराला खरी ओळख राजघराण्यान दिली आहे. लोकांची गरज ओळखून रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्याचा विचार राजघराण्यान केला. दुरदृष्टी ठेवून चांगल शहर निर्माण करण्यासाठी नियोजन केलं आहे‌. मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांनी निरपेक्ष भावनेने विचार केला. तेव्हा हा विचार केला नसता तर आज ही परिस्थिती असती का ? हा प्रश्न आहे. त्यामुळे आज राजघराण्याची परतफेड करण्याची वेळ आहे. म्हणून, राजघराण्याला नगराध्यक्षपदासाठी संधी दिली. सगळ्या राजकीय पक्षांकडून सावंतवाडीकर म्हणून विचार होईल अशी अपेक्षा होती. समोरून कोणी अर्ज दाखल करता नये होता. प्रतिस्पर्धींची वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटत आहे. राजघराण संपलं हा शब्द वापरला जातोय. मदत मागताना हा शब्द आठवला नाही ? तेव्हा का ताठ भुमिका नाही घेतली ? असा सवाल मंत्री राणेंनी केला. राजकारण २ डिसेंबर पर्यंत आहे. मात्र, हेच घराण इथे असणार आहे. राजघराण आपला स्वाभिमान, अस्मिता आहे. आपल्या घरात माता-भगिनी आहेत याचाही विचार केला पाहिजे. दीपक केसरकर यांच आश्चर्य वाटलं. ते पाठींबा देतील अस वाटल होत. राजघराण्याच्या आशीर्वादा शिवाय न बोलणारे केसरकर आता का बोलले नाहीत ? पाठिंबा का दिला नाही असा सवाल त्यांनी केला. राजकारण, समाजकारण प्रतिष्ठेशिवाय मोठा असता नये. उमेदवार उभा केला तरी दीपक केसरकर यांचा पाठिंबा श्रद्धाराजेंना आहे असा दावा त्यांनी केला. श्रद्धाराजेंना मत म्हणजे दीपक केसरकरांना मत आहे. ये अंदर की बात है, दीपक केसरकर हमारे साथ हैं!, आज व्यासपीठावर देखील दिसले असते. त्यामुळे ही निवडणूक राजकारणाची नाही, परतफेड करण्याची आहे. पुढच्या पिढीला माणूसकी शिकवण्याची ही निवडणूक आहे. राजघराण्यासह उभं राहण्याची ही निवडणूक आहे. २ तारखेला काहींचा कार्यक्रम करू, पोटनिवडणुकी नंतर काहींचे संस्कार कळलेत. युवराज्ञींच व्हिजन शहर विकासाच आहे. भाजपच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्ही फक्त भाजपला आशीर्वाद द्या. पालकमंत्री मी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. भरघोस निधी सावंतवाडी शहराला देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेत युवराज लखमराजेंनी देखील अत्यंत भावुक मनोगत व्यक्त करत सावंतवाडीकरांची मनं जिंकली. पुढील पाच वर्ष सक्षमपणे आम्ही करू, लोकसेवेसाठी आम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. ही सुंदरवाडी खेमसावंत यांनी वसवली‌. ३५० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. मोती तलाव, राजवाडा लोकांचा आहे, असं मत युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केले. आरोग्य, ड्रेनेज सिस्टीमसह इतर सुविधा राजघराण्याच्या काळात झाल्या. मात्र, नंतर त्यावर तेवढं लक्ष दिलं गेलं नाही आज आमच्या माध्यमातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून ती संधी आम्हाला मिळत आहे‌. आरोग्य सेवा व ड्रेनेजची समस्या आम्ही १०० टक्के सोडवणार आहोत. त्या काळात राजघराण्यान हे काम केले.‌ युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले या सामान्य घराण्यातील आहेत. मात्र, त्यांचा विवाह राजघराण्याशी झाला. त्यांनाही सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. राजमाता, राणी हा मान जनतेनं आम्हाला दिला. जमीन, पैसा येतील जातील पण लोक कायम सोबत राहतात, यासारखे भाग्य आहे. शिवरामराजे भोसले यांचा वारसा आम्ही चालवत आहोत. मधल्या पिढीने सामाजिक, शैक्षणिक कार्य केलं. अनेक जमीनी दिल्या आहेत. आजही जमीनी द्यायला तयार आहोत. लोकांसाठी काम करण्याचा आमचा हेतू आहे. राजघराण सदैव लोकांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही सामान्य घराण्यासारखेच आहोत. तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असणार असून तुमच्या दारात देखील सेवेसाठी थांबणार आहोत. तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन युवराज लखमराजे भोंसले यांनी केलं. दरम्यान यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा युवा नेते विशाल परब यांनी देखील सावंतवाडीच्या राजघराण्याचे कौतुक करीत आता आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले पाहिजे असं आवाहन सावंतवाडीकरांना केलं.

एकंदरीत सावंतवाडीच्या गांधी चौकातील भारतीय जनता पार्टीची ही विकासाची संकल्पनात्मक आखणी जनतेसमोर मांडणारी सभा म्हणजे प्रचंड वातावरण बदलणारी ठरली तर दीपक केसरकर यांच्या राजकारणाबद्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारी देखील ठरली आहे. एकूणच या सभेमुळे आता भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आणि विशेषत: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रचंड बळ देणारी देखील ठरली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles