– छत्रपतींच्या पदस्पर्शच्या भूमीतून, श्रीमंत श्रद्धाराजे भोंसले आणि वेदिकाताई परब या कणखर नेत्यांच्या रूपाने सावंतवाडीकर अनुभवणार एक आदर्श ‘महिलाराज’.
सावंतवाडी : कोकणातील ऐतिहासिक सावंतवाडी शहराच्या राजकारणात सध्या ‘नारी शक्ती’ एक वेगळाच अध्याय लिहीत आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत श्रद्धा राजे भोसले आणि वेदिकाताई परब या दोन प्रमुख महिलांनी राजकारणात दमदार एंट्री घेतल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या या दोन्ही महिला नेतृत्वाकडून मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे की, त्या सावंतवाडीच्या विकासाचे ध्येय साध्य करतील. श्रद्धा राजे भोसले आणि वेदिकाताई परब या ‘नारी शक्ती’च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राचे नेतृत्व मा. देवेंद्रजी फडणवीस आणि मा. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, खासदार नारायणराव राणे व सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. नीतेशजी राणे यांच्या व्हिजननुसार, सावंतवाडीमध्ये सकारात्मक आणि गतिमान बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे.
या नेतृत्वामुळे सावंतवाडी नगरपरिषद आणि परिसराच्या विकासाच्या धोरणांना नवी ऊर्जा मिळेल.
वेदिकाताई परब या सावंतवाडीतील भाजपच्या आणखी एक महत्त्वाच्या आणि प्रभावी महिला नेत्या आहेत. त्यांचे स्थानिक पातळीवरील कार्य आणि जनसंपर्क भाजपच्या ‘नारी शक्ती’ मोहिमेला बळ देणारा आहे. श्रद्धा राजे भोसले यांच्यासोबत वेदिकाताई परब यांच्यासारख्या सक्रिय स्थानिक नेत्यांचा समन्वय सावंतवाडीमध्ये भाजपला विकासाचे नवे पर्व सुरू करण्यास मदत करेल.
सावंतवाडीच्या मतदारांनी या दोन्ही ‘नारी शक्ती’वर विश्वास दाखवल्यास, राजकारणात एक नवा आणि सकारात्मक बदल घडून, सावंतवाडीचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता या नेतृत्वामध्ये नक्कीच आहे.


