सावंतवाडी : ‘शिक्षक ध्येय’ या प्रख्यात समाजसेवी संस्थेमार्फत दरवर्षी विद्यार्थी मित्र बाल चित्रकला पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा बाल चित्रकला पुरस्कार मिलाग्रीस हायस्कूलच्या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या कु. प्रिया प्रदीप देसाई या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला आहे. कु. प्रिया देसाई हिच्या चित्राचा ब गटामधून प्रथम क्रमांक आला आहे.
प्रियाने हा पुरस्कार तिसऱ्यांदा प्राप्त करत यशाची हॅट्ट्रिक साधली आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा,,पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.
मिलाग्रीस प्रशालेची विद्यार्थिनी प्रिया देसाई ‘लई भारी!’ ; ‘बाल चित्रकला पुरस्काराची’ केली हॅट्ट्रिक वारी!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


