दोडामार्ग : अभिजीत हा एक चांगला आणि निष्ठावंत कार्यकर्ता होता. अभिजीतचा अकाली मृत्यू कुटुंबीयांसारखाच आम्हालाही प्रचंड वेदनादायी असून त्यांच्या जाण्याने आमच्या पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. असे भावुक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी येथे व्यक्त केले.

दोडामार्ग येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा व निष्ठावान कार्यकर्ते अभिजीत यशवंतराव देसाई (वय ४८) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले यांनी घेतली. यावेळी त्यांनी देसाई कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादीचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, सुदेश तुळसकर, मधु देसाई, प्रवीण देसाई, अभिलाष देसाई, मनोज वाघमोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अभिजीत यांच्या मागे त्यांचे बंधू अविनाश देसाई, पत्नी अश्विनी देसाई वहिनी अमृता देसाई, मुलगी सिद्धी व भार्गवी तसेच पुतण्या आदित्य देसाई, पुतणी अंकिता देसाई, चुलत भाऊ विजय कृष्णराव देसाई, बहीण पूजा तुकाराम सावंत असा मोठा परिवार आ


