सावंतवाडी : येथील नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष निवडणूक रिंगणात असलेल्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा प्रसाद कोरगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान त्यांनी सर्व मतदारांना मतदान करून लोकशाहीला बळकट करण्याचे विनम्र आवाहन देखील केले आहे. तसेच मागील काळात आपण केलेले सामाजिक क्षेत्रातील कार्य पाहता आपला विजय निश्चित असल्याचेही मत ‘सत्यार्थ’जवळ व्यक्त केले.


