वाशिंग्टन : आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. इलॉन मस्क यांनी येत्या काळात जगात एका ग्लोबल वॉरचा सामना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एका पोस्टला उत्तर देताना ही भविष्यवाणी केली आहे.
इलॉन मस्क हे आपल्या बिनधास्तपणामुळे ओळखले जातात. ते त्यांची मते सोशल मीडियावर व्यक्त करत असता. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टला उत्तर देताना येत्या काळात जगाला मोठ्या युद्धाचा सामना करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. या पोस्टवर या पोस्टमध्ये जागतिक प्रशासनावर आण्विक प्रतिबंधाचा परिणाम कसा होतो यावर त्यांनी आपली मते मांडली आहेत. या एका हंटर नावाच्या युजरने पोस्ट केले होते. यात म्हटले होते की जगभरातील सरकारे युद्धाचा कोणताही बाह्य धोका नसल्यामुळे प्रशासनात कमी प्रभावी होती.
सोशल मीडियावर काय म्हटले ?
एका युजरने आपल्या पोस्टमध्ये लिहीले की सर्व सरकारे बेकार आहेत.कारण न्युक्लियर अस्रे आता पॉवरफुल देशांच्या दरम्यान युद्ध वा त्याच्या धोक्याला रोखतात. आताच्या सरकारांवर कोणत्याही प्रकारचा बाह्य किंवा बाजाराचा दबाव नाहीए. यावर इलॉन मस्क यांनी उत्तर देताना एवढेच सांगितले की युद्ध होणार आहे ! इलॉन मस्क यांच्या मते युद्ध येणाऱ्या ५ ते १० वर्षांच्या आत होणार आहे. आता हे उत्तर इलॉन मस्क यांनी मजेत दिले आहे की गंभीरपणे याची चर्चा केली आहे या संदर्भात काही खुलासा झालेला नाही.
AI Chat Bot ग्रॉकने सांगितले –
त्यांच्या या उत्तरावर काही लोकांनी AI चॅटबॉट ग्रोकवर विश्लेषण मागितले. ग्रोक याने लिहीले की इलॉन मस्क यांनी त्या पोस्ट मध्ये पार्टी वा कारणांना सांगितलेले नाही. आपण त्यांच्या मागच्या वक्तव्यात युरोप आणि युकेत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि आयडेन्टीटी पॉलिटीक्स वा तैवानवर एएस – चीन वा युक्रेन-रशिया युद्धाला तिसऱ्या जागतिक महायुद्धापर्यंत वाढण्याच्या ग्लोबल वॉरचा इशारा दिला आहे.


