Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

वैभववाडीत आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित्त ८ डिसेंबरला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन.

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आनंदीबाई रावराणे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त
वैभववाडी तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होऊन त्यांची बुद्धिमत्ता, रणनीती कौशल्य आणि एकाग्रता वाढावी या उद्देशाने सोमवार, दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये विविध कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख रु.२०००/- ,१५००/- ,१०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धा सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५, रोजी सकाळी १०.०० वा. महाविद्यालयाच्या शहीद मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आली आहे.
वैभववाडी तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालय व्यवस्थापन समिती, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी व जिमखाना विभाग प्रमुख प्रा. एस. बी. पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
प्रा. एस. बी. पाटील – 9503809192
प्रा. एस. एम. करपे – 9096543152 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles