Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

खळबळजनक! – भाजप नेत्याच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट, ९ मुली आणि ४ मुलांना अटक! ; कचऱ्याच्या डब्यात आढळले नको ते साहित्य.

वाराणसी  : भाजप नेत्याच्या फ्लॅटवर स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे नेत्याच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली आहे. भाजप नेत्या फ्लॅटवर सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी छापेमारी करत 9 मुली आणि 4 मुलांना अटक केली आहे. एवढंच नाही तर, पोलिसांना तपासात कचऱ्याच्या डब्यातून नको ते साहित्या मिळाल्यामुळेल सर्वत्र खळबळ माजली आहे. धक्कायदायक गोष्ट म्हणजे, भाजप नेत्या फ्लॅटवर छापा टाकल्यानंतर पोलिसांना इतर ठिकाणी सुरु असलेल्या सेक्स रॅकेटची देखील माहिती मिळाली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे.

ज्या भाजप नेत्याच्या फ्लॅटवर सेक्स रॅकेट सुरु होतं, तो फ्लॅट भाजप नेत्या शालिनी यादव यांचे पती अरुण यादव यांच्या नावावर आहे. त्यानंतर हा फ्लॅट भाड्याने दिलेला. संबंधित फ्लॅट वाराणसी येथील सिगर भागात आहे. रिपोर्टनुसार, सोमवारी रात्री पोलिसांना माहिती मिळाली की, फ्लॅटवर स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु आहे. तेव्हा स्पेशल ऑपरेशन करत पोलिसांनी 9 मुली आणि 4 मुलांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली आसपासच्या भागातून यायच्या आणि फ्लॅटमध्ये आक्षेपार्ह वस्तू, रजिस्टर आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. सध्या याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु असून हा फ्लॅट वाराणसी विकास प्राधिकरणाच्या शक्ती शिखा अपार्टमेंट क्रमांक 112 मध्ये आहे. या कारवाईनंतर, पोलिसांनी महमूरगंज, भेलुपूर आणि कॅन्टोन्मेंट परिसरातील स्पा सेंटरसह जवळच्या इतर स्पा सेंटरवर छापे टाकले. फ्लॅटच्या कचऱ्याच्या डब्यातही गुन्हेगारी साहित्य आढळून आल्याने रॅकेटचा आणखी उलगडा झाला. यामुळे फ्लॅट मालक शालिनी यादव यांचा राजकारणातील प्रवास देखील चर्चेत आहे.

शालिनी यादव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर महापौरपदाची निवडणूक लढवली आणि दुसऱ्या क्रमांकावर आल्या. 2019 मध्ये, त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला, जवळजवळ 2 लाख मतं मिळवून त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यानंतर 24 जुलै 2023 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles