सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यानं त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. मात्र, युपीतील माणस सावंतवाडीत आणून कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ती गाडी अडवली म्हणून गुन्हे दाखल केले. आम्ही सोडवायला गेलो तर आमच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेत, असे वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेना तालुकाध्यक्ष क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते.
युपीतील गुंडांना पोलिस संरक्षण होत. त्यामुळे तो पोलिस कुणासाठी होता ? त्या गाडीत का होता ? तो कुणाच्या संरक्षणासाठी होता ? हा प्रश्न आहे. ती गाडी विशाल परब यांची असून त्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. युपीतील माणसांचं काम काय ? या सगळ्या विषयांवर जिल्ह्यात आळा बसावा म्हणून सर्वपक्षीय मोर्चा आम्ही काढणार आहोत. त्यांनी एखादा मर्डर केला तर जबाबदार कोण ? युपीतील माणस शहरात असतील तर त्यांची नावं सार्वजनिक करावी. जर ब्रेक लागला नसता तर दोन- तीन लोकांचा बळी गेला असता.
आचारसंहिता संपल्यावर युपीतील माणसांच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत. ही माणसं कुणाची आहेत,


