सावंतवाडी : राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या भारताच्या अध्यक्षपदी कलिकेश नारायण सिंगदेव सचिव पदी पवनकुमार सिंग तर खजिनदार पदी विक्रम ऊर्फ मेघशाम श्रीपाद भांगले यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीची अधिकृत घोषणा गुरूवारी पंजाब मोहाली येथे पार पडली असून रायफल असोसिएशन च्या खजिनदार पदी सावंतवाडीच्या सुपूत्राची निवड झाल्याबद्दल सर्वथरातून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाची निवडणूक प्रकिया अलिकडेच पार पडली. या निवडणूक प्रकियेनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच असोसिएशन च्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी पंजाब मोहाली येथे बैठक पार पडली या बैठकीत असोसिएशन च्या अध्यक्ष पदी कलिकेश नारायण सिंग देव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर उपाध्यक्ष कनवर सुलतान सिंग व सुषमा सिंग तसेच सचिव म्हणून पवनकुमार सिंग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
या असोसिएशन मध्ये सावंतवाडी च्या सुपुत्राला मानाचे स्थान देण्यात आले असून विक्रम ऊर्फ मेघशाम भांगले यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली आहे तर सहाय्यक सचिव रणदीप मान गौरी मोहंती यांची निवड करण्यात आली असून सदस्य पदी शीला कानूनगो,कुमार त्रिपुरी सिंग,अमर जंग सिंग नील सूडनीक यांची निवड करण्यात आली आहे.त्याच्या या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल विक्रम ऊर्फ मेघशाम भांगले यांनी रायफल असोसिएशन कडून देशातील सर्व खेळाडूंना न्याय देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे स्पष्ट केले.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत-जास्त खेळाडू रायफल शूटिंग मध्ये सहभाग व्हावेत यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे भांगले यांनी सांगितले.
सावंतवाडीच्या सुपुत्राचा अजून एक ‘माईलस्टोन’, राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या खजिनदार पदी विक्रम भांगले! ; पंजाब येथील बैठकीत निवड.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


