Wednesday, December 24, 2025

Buy now

spot_img

‘तथागत’ पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा!

कणकवली:  सिंधुदुर्ग जिल्ह्यात बौद्ध सcमाजाच्या सर्वसमावेशक समाजाची प्रथमच सुरू झालेल्या तथागत नागरि पतसंस्थे चा प्रथम वर्धापन दिन बुधवारी कणकवली येथील मुख्य कार्यालयात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजु, उपाध्यक्ष सूर्यकांत कदम संचालक मोहन जाधव रमेश कदम सुहास कदम ,प्रमोद कासले सिद्धार्थ कदम, के एस कदम, श्रद्धा कदम ,व्यवस्थापक सुनील कदम यांच्यासह सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी अध्यक्ष वळंजु, उपाध्यक्ष सूर्यकांत कदम व मान्यवरांच्या हस्ते नाम फलक व तथागत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना त्रिशरण व भारतीय राज्यघटने च्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले . प्रास्ताविक उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी करून पतसंस्थेच्या वर्षभरातल्या वाटचालीचा आढावा घेतला व पतसंस्थेसाठी योगदान देणाऱ्या सर्व संचालक ,सभासद हितचिंतक, कर्मचारी या सर्वांचे कृतज्ञता व्यक्त करून असेच सहकार्य यापुढे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली .तर अध्यक्ष वळंजू यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाला एक नव दालन आम्ही खुल करून दिला आहे याची संधी समाजाच्या सर्व घटकांनी घेऊन ही पतसंस्था नावारूपात आणण्याची जबाबदारी समाजाची असल्याने समाजातील प्रत्येक घटकांनी या पतसंस्थेचे दायित्व स्वीकारावे असे आवाहन केले. गेल्या तीन डिसेंबर रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या बौद्ध समाजाच्या पहिल्या पतसंस्थेचे वर्षभरातील वाटचाल ही कौतुकास्पद असल्याने पतसंस्थेच्या या जडणघडणीत सर्व समाजाने योगदान द्यावे असे आवाहन केले .यावेळी मोहन जाधव, प्रमोद कासले रमेश कदम, सुहास कदम ,सिद्धार्थ कदम ,के एस कदम, आनंद धामापूरकर श्रद्धा कदम, यांच्यासह भीमराव कदम ,बाजीराव कांबळे , स्वाती कदम, ममता जाधव, ज्योती कदम इत्यादींनी शुभेच्छा दिल्या . यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका ममता जाधव, स्वाती कदम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कदम यांनी केले तर आभार पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील कदम यांनी मानले . यावेळी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून पतसंस्थेचा 9309035923 या क्रमांकाचा मोबाईल लॉन्च करण्यात आला असून यापुढे सर्व सभासदांची संपर्क साधण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध करून दिले आहे. तरी सभासदांनी याचे नोंद घेऊन पतसंस्थेचे या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles